ताज्या घडामोडी

फजल कच्छी चे कौतुकास्पद यश

फजल कच्छी चे कौतुकास्पद यश..�
येथील युसुफ भाई कच्छी (पेंटर )यांचे सुपुत्र फजल युसुफ कच्छी याने बी. कॉम. एल.एल.बी (२०२२/२३) च्या परीक्षेत यश संपादित केले. पण हे यश संपादन करताना या यशाला एक वेगळे अनन्यसाधारण महत्व आहे. एक तर युसुफ भाई यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची अन् त्यात उदर निर्वाह चा प्रश्न आणि त्यात दोन अप्यत्याना शिक्षण देणे म्हणजे कठीणच. कसे बसे माध्यमिक पर्यंत त्यांनी दोन्ही मुलांना शिक्षण दिले. फजल मध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची आस असल्याने, त्याने छोटे मोठे कामधंदे करीत आपल्या शिक्षणाचा गाडा पुढे नेत पदवी गाठली. याच दरम्यान त्याने आपल्या मित्राच्या सहयाने कांदा निर्यात क्षेत्रात पावूल टाकले. एकेकाळी कांद्याला भाव नसताना अशा परिस्थीत त्याने गोल्टी कांद्याला चक्क व्हीएतनाम ची बाजारपेठ दाखवत आपली गुणवत्ता सिद्ध करत संपूर्ण राज्यात आपली युवा व्यापारी म्हणून ख्याती मिळवली. याच दरम्यान कठोर परिश्रम घेत त्याने एल.एल.बी. ची परीक्षा उत्तीर्ण केली. खरचं या यशाने संपूर्ण कुटुंबास गगन ठेंगणे झाले. याच गोष्टीचा अभिमानासपद कौतुक व्हावं म्हणून फुले, शाहू, आंबेडकर मुस्लिम विचार मंच यांच्या वतीने हॉटेल श्रीलीला येथे जितेंद्र (जितू सेठ) चोरडिया, चंद्रकांत मोकळं यांच्या हस्ते फजल चा सत्कार हाजी रफिक बाबूजी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. याप्रसंगी मंचचे कार्यअध्यक्ष फिरोज शेख, मो.रईस फिटर ,शब्बीर शेख,विद्यमान निरभवने,नासीर मेमन आदी उपस्थित होते. सत्कारास उत्तर देताना या यशाचे श्रेय आई बाबा आणि माझ्या भावाला जाते असे भावुक होऊन दिले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!