ताज्या घडामोडी

लासलगाव बाजार समिती मधील मुख्य आवारातील इलेक्ट्रॉनिक भुईकाटा बंद तात्काळ सुरू करा शिवसेना पदाधिकारी व शेतकरी बांधवांची बांधवांची मागणी. लासलगाव..

संपादक राहुल वैराळ

आशिया खंडात नंबर एकची बाजार समिती असा नावलौकिक असलेल्या लासलगाव बाजार समिती मधील मुख्य आवरातील इलेक्ट्रॉनिक भुईकाटा गेल्या पंधरा दिवसापासून नादुरुस्त असल्यामुळे बंद आहे,यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
योगायोग मागील महिन्यातच मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातर्गत सन 2021/22 वर्षाच्या कामगिरीच्या आधारे पणन संचालनाल्याच्या क्रमवारीत राज्यात आपल्या बाजार समितीला 305 बाजार समित्यामधून प्रथम क्रमांक भेटला आहे.यामध्ये मुख्यता शेतकरी व व्यापारी वर्ग यांचे अमूल्य योगदान आहे.तरी देखील शेतकरी वर्गाची बाजार समितीच्या सुविधा पासून ची असलेली वन वन थांबलेली नाही .
बाजार समितीच्या मुख्य आवारात धान्य व कडधान्य यांचे लिलाव होतात.फक्त नाशिक जिल्हा नव्हे तर संभाजी नगर, अहमद नगर ,धुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून हजारो शेतकरी बांधव या बाजार समितीमध्ये धान्य विक्रीसाठी येतात.खरीप हंगामामध्ये मोठया प्रमाणात धान्य आवक होत आहे.तसेच बाजार समिती आवरात काही कांदा व्यापारी यांचे खळे देखील आहे.यामुळे कांदा व धान्य लिलाव झाल्या नंतर मोजमाप करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक भुईकाटा वापरला जातो,यामुळे जलद मोजमाप होऊन
शेतकरी वर्गाला तात्काळ हिशोबपट्टी व पैसे हातात मिळतात.परंतु सध्या भुईकाटा पंधरा दिवसांपासून बंद असल्यामुळे शेतकरी वर्गाला तास तास ताटळत उभे राहावे लागत आहे.ऐन खरीप हंगाम पिकांची काढणी सुरु झाली आहे.शेतात देखील अनेक कामे सुरु आहे.मजूर टंचाई,दिवसा विजेचा आभाव,अतिवृष्टी अशा अनेक संकटाचा शेतकरी सद्या सामना करत आहे.त्यात भर म्हणजे लासलगाव बाजार समितीमध्ये धान्य विक्रीसाठी आल्यावर सुविधा नसल्यामुळे संपूर्ण दिवसभर वेळ वाया जात आहे.तसेच व्यापारी वर्गाला देखील याचा मनस्ताप होत आहे.
याची दखल लासलगाव शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील व पदाधिकाऱ्यांनी घेतली.तात्काळ बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे यांची भेट घेऊन चौकशी केली असता त्यांनी भुईकाटा दुरुस्ती करिता एक दीड महिना वेळ लागेल असे उत्तर दिले व समस्या निराकरण करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. त्यामुळे नाशिक जिल्हा उप निबंधक श्री सतीश खरे साहेब यांना संपर्क करून व निवेदन देऊन शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी लासलगाव बाजार समिती मधील भुईकाटा पंधरा दिवसापासून बंद असल्याबाबत तक्रार केली असता व आपण लक्ष घालून भुईकाटा सुरू करण्याबाबत मागणी केली आहे .यावर तात्काळ लासलगाव बाजार समिती च्या अधिकाऱ्यांना आदेश करून शेतकरी बांधवांची व धान्य,कांदा व्यापारी वर्गाची अडचण दूर करणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक श्री सतीश खरे साहेब यांनी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा संघटक बाळासाहेब जगताप ,शहर प्रमुख प्रमोद पाटील ,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब छत्र होळकर मा.प.स सदस्य उत्तम राव वाघ, तालुका समन्वयक केशवराव जाधव , फिरोज मोमीन .भ. प. बाळासाहेब शिरसाट यांना आश्वासित केले आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!