ताज्या घडामोडी

महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य मुंबई मंञालयात पैठणी विणकरांच्या समस्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक

*महाराष्ट्र शासन,मंञालयात पैठणी विणकरांच्या समस्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक*

मुंबई :- येवल्यातील विणकारांच्या विविध समस्यांबाबत सोमवार दि.१७/०७/२०२३ रोजी मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री लोकनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मंगळवार दि.२० जून २०२३ रोजी येवल्यातील पैठणी विणकारांच्या विविध समस्यांबाबत भारतीय जनता युवा मोर्चाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मयुर मेघराज यांनी निवेदन दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावर लवकरच बैठक घेण्यासाठी वस्त्रउद्योग विभागाला आदेश दिले होते.
दि.१७/०७/२०२३ रोजी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मयुर मेघराज यांच्या उपस्थितीत मंत्रालय येथील तिसऱ्या मजल्यावर बैठक पार पाडण्यात आली. सदर बैठकीस मा.सचिव वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबई, मा.आयुक्त वस्त्रोद्योग आयुक्तालय नागपूर, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ यांच्यासह अधिकारी व पैठणी विणकर या बैठकीस उपस्थित होते बैठकीमध्ये विणकारांच्या विविध समस्या मयुर मेघराज यांच्या कडून मांडण्यात आल्या त्यात प्रथमता: विनकर सेवा केंद्र हे विणकारांसाठी राज्य सरकार व केंद्र सरकार ज्या ज्या योजना असतील त्या डायरेक्ट विणकारांपर्यंत पोहचवते राज्यात मुंबई व नागपुर येथे पैठणी विणकर सेवा केंद्र आहेत पैठणी विणकारांसाठी येवला मध्ये ही विणकर सेवा केंद्र उघडणे किती गरजेचे आहे हे बैठकीत समजून सांगण्यात आले , कच्चा माल पुरवठा योजनेतील RMMS शासन मान्यता प्राप्त केंद्र येवल्यात आहेत त्यांनी कच्चा माल पुरवठा योजनेअंतर्गत त्यांच्या केंद्रामधून किती विणकारांनी योजनेचा लाभ मिळवून दिला या सर्वांचे महिन्याला ऑडिट करण्यात यावे त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शासन मान्यता प्राप्त RMMS केंद्र येवल्यात वाढविण्यात भर देण्यात यावे, राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०२३ ते २८ यामध्ये २०१८ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ३३५४ हातमाग आहेत व ३५०९ हातमाग कारागीरंद्वारे चालवले जात आहे. असे नमूद करण्यात आले आहे. परंतु २०१८ साली फक्त येवला तालुक्यातच ३००० पेक्षा अधिक हातमाग असून ४५०० हातमाग कारागीर होते हे समजावून सांगण्यात आले व आताच्या स्थितीला ५००० पेक्षा अधिक हातमाग व ६५०० पेक्षा अधिक हातमाग कारागीर येवल्यात आहेत व सातत्याने वाढत ही आहे.चुकीच्या सर्वे मुळे अनेक विणकर शासकीय योजनांपासून वंचित राहतात त्यामुळे विणकारांची राज्य शासनाने स्वतः जनगणना करणे किती गरजेचे आहे त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग धोरणामध्ये औरंगाबाद मध्ये सील टुरिझम कॉरिडोर उभारण्यात येणार आहे तसेच सिल्क टुरिझम कॉरिडोर येवल्यातही उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली,हातमाग विपणन व्यवस्थेसाठी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळातर्फे वेब पोर्टल उघडण्यात आलेले आहे.www.mahahandloom.com या वेब पोर्टल द्वारे विणकारांना साड्या विक्री करणे कसे सुलभ होईल यात भर देण्यात द्यावे ,सामान्यतील सामान्य विणकर या पोर्टलशी जोडण्यासाठी विणकारांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती कार्यक्रम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पैठणी साडीला योग्य मोबदला भेटेल असे मेघराज यांच्याकडून सांगण्यात आले

राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०२३ ते २८ मध्ये विकारांसाठी अनेक योजना आहेत त्यात प्रामुख्याने गणेश चतुर्थी निमित्त शासन नोंदणीकृत विणकारांना प्रति पुरुष रु १०,००० व महिला विनकरांना रु १५,००० उत्सव भत्ता देण्यात येणार आहे, हातमाग कुटुंबांना प्रतिमा २०० यूनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येईल अशा अनेक योजना आहेत ते सर्वसामान्य विणकारांपर्यंत लवकरात लवकर कसे पोहचेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे विणकर कारागीर रवींद्र शिंदे व ऋषिकेश शहारे यांच्याकडून सांगण्यात आले.

केंद्र सरकार व राज्य सरकार विणकारांच्या प्रगतीसाठी अनेकयोजना आणलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ यातही विणकारांसाठी राज्य शासनाने अनेक योजनांचा समावेश केलेला आहेत. येवल्यातील विणकर सेवा केंद्राची गरज लक्षात घेता येवल्यात विणकर सेवा केंद्र उघडण्यासाठी आम्ही केंद्राकडे मागणी करू व तसेच राज्य सरकार स्वतः लवकरच विणकारांची जनगणना करेल.
-: मा.ना.चंद्रकांत दादा पाटिल
मंत्री: सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासन

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!