ताज्या घडामोडी

घरूनच थेट ‘ऑनलाइन’ पोलिस तक्रार

3नोव्हे.2017ची बातमी आहेत !परंतु अद्याप जन माहीती साठी !परंतु ?

घरूनच थेट ‘ऑनलाइन’ पोलिस तक्रार

नागपूर- अनेकांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविण्यासाठी वेळ नसतो किंवा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांची वागणूक योग्य नसल्यामुळे पोलिसांच्या नाहकच्या त्रासाला अनेक जण कंटाळलेले असतात. त्यामुळे काही जण पोलिस तक्रार करणे टाळतात. मात्र, आता कुणालाही घरबसल्या पोम् ठाण्यात ऑनलाइन तक्रार करता येणार आहे. पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी आज ‘सिटिझन पोर्टल’चे उद्‌घाटन केले. या पोर्टलवरून शहरातील कोणत्याही ठाण्यात ऑनलाइन तक्रार करता येणार आहे.सीसीटीएनएसचे जाळे संपूर्ण देशात पसरविण्यात आले आहे. प्रत्येक पोलिस स्टेशन सीसीटीएनएसमुळे ऑनलाइन झाले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी हे सिटिझन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. पूर्वी लोकांना शहर नियंत्रण कक्षाला माहिती देऊन किंवा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवावी लागत होती. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत होता. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आल्याचे डॉ. व्यंकटेशम यांनी आज आयुक्‍तालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. या पोर्टलमध्ये घरबसल्या विविध तक्रारी करता येतील. तक्रारीत संबंधित पोलिस ठाणे, झोन किंवा परिसराचा उल्लेख असावा. पोर्टलवर आलेली तक्रार संबंधित पोलिस ठाण्याला पाठविण्यात येईल. तक्रार दखल घेण्याजोगी असल्यास तक्रारदाराला संबंधित पोलिस ठाण्यात बोलविण्यात येईल. संपूर्ण राज्यात हे पोर्टल सुरू झाल्याचे पुढे त्यांनी सांगितले. पोर्टलवर आलेल्या तक्रारी शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त आणि त्यांचे सहकारी हाताळतील. पोर्टलवर तक्रार केल्यास लगेच तक्रारदाराला कुठल्या पोलिस ठाण्याला तुमची तक्रार गेली हे मोबाईल एसएमएसद्वारे सांगण्यात येईल. त्याचप्रमाणे तपास अधिकारी कोण आहेत याचीही माहिती मोबाईल एसएमएसने देण्यात येईल. संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार गेल्यानंतर आठ दिवसांत त्यावर कारवाई करण्यात येईल. तक्रारीची दखल न घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला पोलिस सहआयुक्‍त शिवाजी बोडखे, पोलिस उपायुक्‍त संभाजी कदम उपस्थित होते…. तर मुन्ना यादववर कारवाई फटाके फोडण्यावरून १९ ऑक्‍टोबर रोजी भाजपचा वादग्रस्त नेता मुन्ना यादव, नगरसेविका पत्नी लक्ष्मी यादव आणि त्याच्या कुटुंबीयांनी एका महिलेच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले. मात्र, अजूनपर्यंत दोन्ही गटांतील लोकांना अटक करण्यात आली नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता गरज भासल्यास मुन्ना यादवर कारवाई करू, असे उत्तर आयुक्‍तांनी दिले. याच मुद्द्यावर पत्रकारांनी पोलिस आयुक्तांवर प्रश्नांचा भडीमार केला असता त्यांनी थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेली. अस्या

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!