ताज्या घडामोडी

चिंचखेड हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमाकांत चौधरी यांचा सत्कार.

चिंचखेड हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमाकांत चौधरी यांचा सत्कार.
मनोहर देसले [पोलीस टाईम्स न्यूज] निफाड तालुका प्रतिनिधी
चिंचखेड हायस्कूलचे मुख्याध्यापक रमाकांत चौधरी सेवा निवृत्ती मुळे त्यांचा सत्कार निफाडएज्युकेशन संचालक बी आर पाटील, पंढरीनाथ संधान, योगेश मेधने, अण्णा थोरात भाऊदास पगारे यांच्या हस्ते करण्यात आला प्रसंगी बी आर पाटील म्हणाले की चौधरी सर हे विद्यार्थी प्रिय शिक्षक व मुख्याध्यापक होते त्यांनी 35 वर्ष सेवा काल पूर्ण केला त्यांनी इंजिनियर डॉक्टर व प्रगतशील शेतकरी असे विद्यार्थी घडविले एसएससी बोर्डात दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयात प्रत्येक वर्षी प्राविण्य मिळवून दिले विद्यार्थी म्हणून योगेश मेधने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले चौधरी सर हे आम्हा मुलांना शिस्तप्रिय शिक्षक लाभले सरांचं नातं हात आणि डोळे हे होते जसे हाताला लागले तर डोळ्याला पाणी येते व डोळ्याला पाणी आल्यानंतर हात आपोआप डोळे पुसायला जातात असे हे आमचे सरांचे नाते होते प्रसंगी चौधरी सर म्हणाले की चिंचखेड गावाने मला खूप सहकार्य केले शाळेसाठी वेळोवेळी गावांनी मदत केले पालकांनी मुलांविषयी कोणत्याही प्रकारची तक्रारही केली नाही त्यामुळे मी विद्यार्थी घडवू शकलो तरीही इथून पुढेही मी दहावीच्या विद्यार्थ्यांचे गणित व सायन्स वर्ग घेणार आहे हायस्कूलचे मुख्याध्यापक जाधव सर पवार सर देशमाने सर सौंदाणे सर ढोकळे मॅडम मोरे मॅडम चव्हाण मॅडम भगवान वाघ आदी शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते आभार देशमाने सर यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!