नवी मुंबई मध्ये आम आदमी पार्टी चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. श्यामभाऊ कदम व तुर्भे रोड उपाध्यक्ष श्री शंकर पडुळकर यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना संविधान भेट…
नवी मुंबई मध्ये आम आदमी पार्टी चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. श्यामभाऊ कदम व तुर्भे रोड उपाध्यक्ष श्री शंकर पडुळकर यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना संविधान भेट…
नवी मुंबई प्रतिनिधी:-सुबोध सावंत
तुर्भे :आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष श्री श्याम भाऊ कदम यांच्या सूचनेनुसार तसेच तुर्भे नोड उपाध्यक्ष श्री. शंकर पडुळकर यांनी तुर्भे एम.आय.डी.सी.पोलीस ठाण्याचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. रविंद्र दौंडकर साहेब यांची भेट घेऊन यांना भारतीय संविधानाची प्रत दिली. १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम आदमी पार्टी नवी मुंबई कडून, भारतीय संविधानाची प्रत भेट देत डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न अधुरे, फक्त केजरीवालच करतील पुरे. आम आदमी पार्टी हे एक संविधान प्रेमी, धर्म-जाती निरपेक्ष, निस्वार्थी आणी देशप्रेमी सामान्य नागरिकांचे संघटन आहे. आदरणीय बाबासाहेबानी लिहिलेले आपल्या देशाचे संविधान देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क देते. प्रत्येक चिमुकल्याला चांगल्या आणी मोफत शिक्षणाचा हक्क देते. प्रत्येक वयोव्रुध्दाला चांगल्या आणी मोफत आरोग्य सेवेचा हक्क देते.
पण दुर्देवाने, आज स्वात्यंत्र प्राप्तीला ७५ वर्षे उलटून सुध्दा, संविधानाने दिलेल्या ह्या हक्कानं बद्दल म्हणावी तशी जागरूकता जनते मध्ध्ये आलेली नाही. त्याच प्रमाणे, आज काही मूठभर देशविघातक शक्तींकडून जाणून बुजून संविधानाची गळचेपी करण्याचे प्रयत्न होत आहेत. ह्याच पार्शवभूमीवर आम आदमी पार्टी ह्या राष्ट्रीय पक्षातर्फे, विविध सरकारी पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून, संविधानाची प्रत, भेट म्हणून देण्याचा उपक्रम चालू केला आहे.
आम आदमी पक्ष नवी मुंबई तर्फे भेट म्हणून देण्यात येणाऱ्या ह्या संविधान प्रतीचा स्वीकार करून आमल करावे असे मत तुर्भे नोड चे उप आध्यक्ष शंकर पडुळकर यांनी मत व्यक्त केले.