ताज्या घडामोडी

*सलमान खानला पुन्हा मिळाली जीवे मारण्याची धमकी, फोन करून म्हणाला- ‘३० एप्रिलला मारणार’*

*सलमान खानला पुन्हा मिळाली जीवे मारण्याची धमकी, फोन करून म्हणाला- ‘३० एप्रिलला मारणार’*

मुंबई– बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. काल १० एप्रिल रोजी सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी तो उपस्थित राहिला होता. एकीकडे अभिनेत्याला पाहून त्याचे चाहते आनंदी झाले असताना दुसरीकडे, सलमानला अजूनही धमक्या मिळणं थांबलेलं नाही. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याला धमकीचा मेल आला आहे. यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यातही आली होती. चौकशीत मेलचं कनेक्शन थेट यूकेमधून असल्याचं समोर आलं होतं. पुन्हा एकदा सलमानला फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोन करणाऱ्याने यावेळी हल्ल्याची तारीखही सांगितली. हे वृत्त समोर आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने १० एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केला. यादरम्यान कॉलरने ३० एप्रिलला सलमान खानला मारणार असल्याचे सांगितले. यासोबतच फोन करणार्‍याने स्वतःला रॉकी भाई म्हणवून घेत जोधपूरचा गोरक्षक असल्याचे सांगितले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!