ताज्या घडामोडी

भडगाव पो.स्टे. हद्दीतील पिडीत अल्पवयीन मुलगी हि घरी व गावात मिळून न आल्याने

दिनांक ३०/०७/२०२३ रोजी भडगाव पो.स्टे. हद्दीतील पिडीत अल्पवयीन मुलगी हि घरी व गावात मिळून न आल्याने त्याबाबत भडगाव पो.स्टे.CCTNS NO २२६ / २०२३ भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने मा. श्री. एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, मा. श्री. चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, मा. श्री. अभयसिंह देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांनी सदरचा गुन्हा उघडकिस आणणे बाबत मा. श्री किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना आदेश दिले होते.

त्यावरुन मा. श्री किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि निलेश राजपुत, पोउपनिरी गणेश वाघमारे, गणेश चोभे, पोह विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, विजय जळगाव यांनी पाटील, लक्ष्मण पाटील, प्रितम पाटील, महेश महाजन, अनिल जाधव, अकरम शेख, किशोर राठोड, ईश्वर पाटील, किरण चौधरी, हेमंत पाटील, हरिष परदेशी, महेश पाटील, रमेश जाधव, भारत पाटील, प्रमोद टाकूर, दर्शन ढाकणे सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.

त्यावरून वर नमुद पथकाने शोध सुरु केला असता दिनांक ०१/०८/२०२३ रोजी अल्पवयीन पिडीत मुलगी हिचे प्रेत हे भडगाव पो.स्टे. हद्दीत आरोपीचे गोठया (खळयातील) कुट्टीचे ढिगा जवळ चप्पल मिळून आली त्यावर कुट्टीचे ढिग उपसून पाहिला असता अल्पवयीन मुलीची प्रेत मिळून आले. त्यानंतर तपासात खळयाचे मालक याची व त्याचे कुटुंबाची चौकशी करीत असतांना खळयाचे मालकाचा मुलगा स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील, वय १९, ता. भडगाव जि. जळगाव याचेवर जास्त संशय बळावल्याने त्यास वरील पथकाने ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अधिक तपासकामी भडगाव पो.स्टे. चे ताब्यात दिले असून सदर गुन्ह्याचा तपास मा. श्री अभयसिंह देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांचे मागर्दशनाखाली पो. निरी. श्री राजेद्र पाटील व त्यांचे पथक हे करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!