ताज्या घडामोडी

अमळनेरात धाडसी घरफोडी; ५३ हजारांचा ऐवज लांबवला

अमळनेरात धाडसी घरफोडी; ५३ हजारांचा ऐवज लांबवला

प्रतिनिधी शाहिद खान

अमळनेर : शहरात चोरऱ्या- घरफोड्या वाढल्या असतांनचा गणेश कॉलनी धाडसी घरफोडी झाल्याची बाब उघडकीस आली आहे. चोरट्यांनी बंद घरातून सोन्याचे दागिने मोबाईल व रोकड असा एकूण ५३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लांबवला. याबाबत बुधवारी अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, शितल दीपक पवार, (वय-४१) गणेश कॉलनी अमळनेर, यांच्या तक्रारीनुसार मंगळवार १४ मार्च रोजी रात्री ११ ते १५ मार्च रोजी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दरवाजे कडे कोंडा उघडुन घरात प्रवेश केला कपाटातील २० हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण ५३ हजार ५०० रुपये किमतीच्या मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी पवार यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्धात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!