ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे आयोजित Cyclethone 2023 ,सायकल स्पर्धा उत्साहात संपन्न

लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे आयोजित Cyclethone 2023 ,सायकल स्पर्धा उत्साहात संपन्न.

पोलीस टाईम्स नांदगाव तालुका प्रतिनिधी.आफरोज अत्तार.

लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे आयोजित Cyclethone 2023 ,ही खास महिला व मुलींसाठी ची सायकल स्पर्धा उत्साहात संपन्न झाली ,यात विविध शाळेच्या जवळपास 70 मुलींनी भाग घेतला होता,तसेच इतर महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता,दिनांक 12 मार्च रविवारी लायन्स चिल्ड्रन गार्डन आयु.डी.पी येथून या स्पर्धेला सुरुवात झाली ,स्पर्धेचे प्रोजेक्ट चेअरपर्सन ला डॉ निलेश राठी,ला डॉ अर्चना राठी,ला गणेश हडपे,ला सौ संगीता कदम यांनी स्पर्धकांचे स्वागत करून त्यांना स्पर्धेविषयी नियम व सूचना दिल्या ,लासलगाव फाटा कमानी पर्यंत व परत लाईन चिल्ड्रन गार्डन येत पर्यंत ही स्पर्धा संपन्न झाली,अठरा वर्षा आतील व अठरा वर्षावरील दोन गटात तीन तीन बक्षीस देण्यात आले ,सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले,पंकज खताळ पाटील यांच्यातर्फे सर्व स्पर्धकांना एनर्जी ज्यूस चे वाटप करण्यात आले,मोठ्या गटात प्रथम बक्षीस प्रियंका बिडकर यांना मिळाले द्वितीय क्रमांक डॉक्टर सौ नीलिमा गुजराती,तृतीय सौ नेहा गुजराती,यांना मिळाले,सर्व महिला व मुलींनी या स्पर्धेचा आनंद घेतला,व क्लबच्या स्पर्धेचे आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले,बक्षीस वितरण क्लबचे अध्यक्ष ला सौ वैशाली वाणी ,ला सौ रेखा येणारे,खजिनदार ला सौ सुचिता खताळ यांच्या हस्ते करण्यात आले,याप्रसंगी खास महिलांसाठी आहारविषयक व्याख्यान सौ जंगम मॅडम यांनी दिले,याप्रसंगी लाइन्स क्लब मनमाड सिटी ची सदस्य ,ला पुष्पाताई मतकर,ला डॉक्टर संगीता हाके,ला सुनीता डगळे,ला शशिकांत व्यवहारे,ला डॉ प्रताप गुजराती,ला सिद्धार्थ जोगदंड,ला नितीन पवार,ला हर्षद गद्रे,ला राजेंद्र माळी,ला डॉ जे वाय इंगळे,ला वैभव कापडे,ला भारत जगताप,ला सोमनाथ जी चिंचोरे,ला स्नेहल भागवत,,ला हेमंत कातकडे इत्यादी सदस्यांनी स्पर्धेचे नियोजन केले,राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली,याप्रसंगी पंकज भाऊ खताळव पत्रकार निलेश वाघ,हे आवर्जून शुभेच्छा देण्याकरता उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!