ताज्या घडामोडी

छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून….* *मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत येवला मतदारसंघात १७ कोटी ३४ लक्षच्या चार रस्त्यांच्या कामांना मंजुरी*

*छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून….*
*मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत येवला मतदारसंघात १७ कोटी ३४ लक्षच्या चार रस्त्यांच्या कामांना मंजुरी*

*नाशिक,येवला,दि.१० मार्च :-* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत येवला मतदारसंघातील चार रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या चार रस्त्यांसाठी एकूण १७ कोटी ३४ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या कामांना सुरुवात होणार असून मतदारसंघातील नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.

येवला मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असून विविध विकास कामे मंजूर झाली आहे. यातून येवला मतदारसंघातील नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यांच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत येवला मतदारसंघातील चार रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून या चार रस्त्यांसाठी एकूण १७ कोटी ३४ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

यामध्ये येवला तालुक्यातील गोल्हेवाडी ते नगरसुल, पिंपळखुटे तिसरे तालुका हद्द या ९.२० किलोमीटर रस्त्यासाठी ५ कोटी ४६ लक्ष, येवला ते वडगाव बल्हे-बल्हेगांव-गोल्हेवाडी-सायगांव-न्याहारखेडा-रहाडी या ८.३७ किलोमीटर रस्त्यासाठी ५ कोटी ८० लक्ष निधी मंजूर झाला आहे. तर निफाड तालुक्यातील विंचूर ते डोंगरगाव-देवगाव-ते राज्य महामार्ग ७ ते देशमाने या ५.३६ किलोमीटर रस्त्यासाठी ३ कोटी ७८ लक्ष, प्रमुख जिल्हा मार्ग ते शिवापूर मरळगोई खु.- मरळगोई बु. तालुका हद्द या २.८० किलोमीटर रस्त्यासाठी २ कोटी ३ लक्ष असा एकूण १७ कोटी ३४ लक्षच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे मतदारसंघातील एकूण २५.७५ किलोमीटर रस्त्यांना पुन्हा एकदा झळाळी प्राप्त होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!