ताज्या घडामोडी

तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार*

*तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार*
आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल येवला येथे महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न.
विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक गुरुकुलाचे मा.अध्यक्ष विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस मा.श्री हनुमंतराव भोंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल येवला येथे महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.शीला दत्तात्रेय गाढे मॅडम व मा. सोनल जगदीश पटणी मॅडम उपस्थित होत्या.तसेच गुरुकुलाचे अध्यक्ष मा.भोंगळे साहेब, संत कंकाली बाबा व प्राचार्य कापसे सर हे देखील उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले.
मा. पटणी मॅडम यांनी महिला दिनानिमित्त सर्व महिलांना सल्ला दिला की आपण आपल्या कुटुंबासोबत आपल्या आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे. आपलं आरोग्य सुरक्षित तर आपलं कुटुंब सुरक्षित. असे सांगत त्यांनी सर्व भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
तसेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या यांनी सर्व महिलांना शुभेच्छा देत सांगितले की, ज्योतिबा होते म्हणून सावित्रीबाई होत्या आणि सावित्रीबाई होत्या म्हणून आज आपण सर्व महिला इथे बसलेल्या आहोत.जिजामाता होत्या म्हणून छत्रपती शिवराय होते आणि छत्रपती शिवराय होते म्हणून जिजामातांना राजमातेचा मान मिळाला व वैभव प्राप्त झाले.जागतिक महिला दिन कधीपासून साजरा करण्यात आला व सर्वप्रथम कोणकोणत्या देशांमध्ये साजरा झाला याचा सर्व इतिहास गाढे मॅडम यांनी सर्व महिलांसमोर मांडला.तसेच जागतिक महिला दिनाचा इतिहास हा खूप संघर्षातून निर्माण झालेला आहे हे देखील त्यांनी सांगितले. महिला दिन हा इव्हेंट म्हणून साजरा करायचा नाही किंवा कुठली स्पर्धा म्हणून साजरी करायची नाही,तर प्रत्येक स्त्रीने आपले आत्मपरीक्षण करून प्रत्येक स्त्रीच्या कामाचे कौतुक केले पाहिजे.
स्वातंत्र्याची नेमकी व्याख्या काय हे देखील त्यांनी सांगितले. कितीही खडतर प्रसंग निर्माण झाला तरी स्त्रियांनी आत्महत्या करू नये. असे आवाहन त्यांनी महिला दिनानिमित्त सर्व महिलांना केले.
माननीय अध्यक्ष भोंगळे साहेब यांनी देखील सर्व भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा देत व त्यांच्या जीवनातील काही अनुभव सांगत आपले मनोगत व्यक्त केले. त्यात साहेबांनी सांगितले की स्त्रियांचे मन हे अत्यंत दयाळू आणि सहनशील असतं, कोणत्याही गोष्टीवरून वाईट बोलले तर तिला रडायला येतं आणि कौतुक केले तर आनंदही होतो हा स्त्री चा जन्मजात गुणच आहे आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार ही एक स्त्रीच करू शकते. आपले विचार साधक बनवायचे असतील तर आहार देखील सकसच हवा असे आव्हान देखील स्त्रियांना केले व आपले आरोग्य सांभाळण्यास सांगितले. स्त्रियांच्या कामगिरी बाबत कौतुक देखील केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .कुमकर मॅडम व सौ .घोडके मॅडम यांनी केले.महिला दिना निमित्त अतिशय जोरदार भाषण सौ.हेडगिरे मॅडम यांनी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!