ताज्या घडामोडी

खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न; तणावाखाली असलेल्या अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदेंची कुटुंबासह आत्महत्या; विष पिऊन गळ्यावर सुरी ओढली.*

खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न; तणावाखाली असलेल्या अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदेंची कुटुंबासह आत्महत्या; विष पिऊन गळ्यावर सुरी ओढली.*
कागल प्रतिनिधी
अजिंक्य जाधव
अगदी अल्पावधीत औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील प्रख्यात उद्योगपती अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे शिंदे यांनी आपली पत्नी आणि मुलासह शुक्रवारी रात्री विष प्राशन केल्यानतंर गळ्यावर सुरी ओढून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तणावाखाली गेले होते. या तणावातून त्यांनी स्वत:सह कुटुंबाचा शेवट केला आहे. या घटनेनंतर गडहिंग्लज शहरावासियांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईट नोट लिहिली असून ती गडहिंग्लज पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे सुसाईड नोटमधील तपशील समोर आल्यानंतर आत्महत्येचं खरं कारण समोर येणार आहे. मात्र, एका उमद्या उद्योगपतीने अशा भयावह पद्धतीने आयुष्याचा शेवट केल्याने गडहिंग्लज तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष शिंदे यांनी कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपताना परप्रातीयांना मोठी मदत केली होती. त्यामुळे उद्योगात नाव कमवून सामाजिक योगदान देणाऱ्या संतोष शिंदेंचा अत्यंत शेवट भयावह झाला आहे.

*बेडरुममध्येच केली आत्महत्या*
आज सकाळी संतोष शिंदे यांच्या बेडरूमचे दार न उघडल्याने त्याच्या आई यांनी शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी बेडरुममध्ये तिघांचेही मृतदेह आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची सुसाईड नोट सापडली असून त्यांच्या मानेवरही जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला विष प्राशन केल्यानंतर गळ्यावर सुरी फिरवून भयावह अंत केला आहे. एका प्रकरणामुळे संतोष शिंदे तणावात होते. या प्रकरणात त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला होता. त्या प्रकरणामुळे त्यांना कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. यामुळेच त्यांनी तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
*अल्पावधीत उद्योग विस्तार*
संतोष शिंदे यांनी अगदी अल्प कालावधीत अर्जुन उद्योग समूहात आपलं नाव कमावताना गरुडझेप घेतली होती. अर्जुन उद्योग समूहात तेल उत्पादन, जि, तसेच बेकरी उत्पादनातून राज्यासह कर्नाटकमध्येही उद्योग विस्तार केला होता. त्यामुळे इतका मोठं नाव आणि वलय असल्याने संतोष शिंदे यांनी अशा पद्धतीने आपल्या आयुष्याचा शेवट करतील याची सुतराम कल्पना नव्हती.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!