ताज्या घडामोडी

20साल बाद….जुन्या आठवणींना उजाळा

20साल बाद….जुन्या आठवणींना उजाळा·…
दानोळी प्रतिनिधी: संदीप चौगुले
कवठेपिरान ता. मिरज जि. सांगली २००१/२००२. 10वी ची ब्याच एकत्र येऊन शिकक्षांसोबत स्नेहमेळावा संपन्न
10वाजता शाळेची बेल वाजली आणि पहिल्यांदा प्रार्थनाआणि राष्ट्रगीताने सुर्वात झाली आणि शाळा भरली हिंदकेसरी मारुती माने हायस्कूल चे माजी विद्यार्थी,विद्यार्थिनी व आपलं आयुष्य घडवणारे शिक्षक,शिक्षिका या सर्वांनी मिळून स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला तब्बल 20 वर्षानंतर एकत्र आल्यामुळे सर्वजण भाऊक झाले शिक्षक सुद्धा भारावून गेले प्रत्येक क्षणाला असं वाटत होतं की प्रत्येक मित्र काय करत असतील पण या निमित्ताने का होईना एकत्र येऊ या हेतूने या कार्यक्रमाचे नियोजन केले
या वेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या सुख दुःखांना वाट मोकळी करून दिली, शिक्षकांसोबत सोबत सुद्धा मन मोकळे पणे सर्व विद्यार्थी àविद्यार्थिनी बोलत शिक्षकांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला.
यावेळी शिक्षक हॉल मध्ये येताच सर्वांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केल्यामुळे शिक्षक भारावून गेले होते त्या नंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी स्टेज वर जाऊन आपली ओळख करून दिली त्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला.शिक्षकांना सुध्दा खूप आनंद झाला की माझे विद्यार्थी विद्यार्थिनी खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहेत.त्या नंतर सव शिक्षकांचा शाल,श्रीफळ,देऊन सत्कार करण्यात आला,शिक्षकांनी थोडक्यात आपले विचार मांडले आणि परत ऐकदा सर्वांना आशीर्वाद दिला
तसेच स्नेसंमेलनाचे चे आयोजन करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेची परवानगी घेऊन शाळेचा परिसर स्वच्छ केला आणि या वेळी विद्यार्थांना असं जाणवलं की आपल्या शौचालय मध्ये बऱ्याच वर्षा पासून पाण्याची टाकी नाही मग 10ते 12हजार रुपये खर्चून नवीन पाण्याची टाकी विद्यार्थ्यांनी स्व खर्चातून बसविले आणि आणि गावापुढे एक आदर्श निर्माण करून चागलं काम या निमित्ताने का होईना झालं.त्यामुळे शिक्षक सुद्धा भारावून गेले
त्या नंतर सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये स्वप्नील पाटील (psi), प्रमोद साखरपे (मपोसे),संकेत पाटील(आरोग्य विषयक&शेद्रिय शेती तज्ज्ञ), पै विनोद देसाई,(ग्रामपंचायत सदस्य),राहुल तामगावे(प. रेल्वे टीसी),स्वप्नील आंबोळे,अमित कोळेकर(एमएससीबी),किशोर चौगुले(म पो से),श्रीधर वडगावे (म पो से),विनायक सावर्डे,डॉ पुनम राजमाने,वृषाली बोधले(शिक्षिका),अश्विनी पाटील(शिक्षिका).असे बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी चांगल्या पोस्ट वरती आहेत.मुख्याध्यापक तोडकर सर,पाटोळे सर, दिंडे सर,कोळेकर सर,मगदूम सर,पाटील सर,अडसुळे मॅडम,पाटील मॅडम,नदाफ मॅडम, माळी मॅडम,घेवारी मॅडम,तसेच शाळेचे शिपाई कर्मचारी उपस्थित होते,
या मध्ये प्रामुख्याने कार्यक्रम यशस्वीपने पार पाडण्यासाठी संजय वाघमारे,हणमंत पाटील,अरुण सावळवाडे,प्रवीण उपाध्ये,रणजित जाखलेकर,सुनील पाटील,नितीन तामगावे,संगीता हाबळे,स्वप्नील आंबोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!