ताज्या घडामोडी

जळगाव शहरात बावरी गैंगवर मोक्काची कारवाई

जळगाव शहरात बावरी गैंगवर मोक्काची कारवाई

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस हद्दीतील ५ आरोपींवर मोक्का कायद्याखाली कारवाई करण्यात आली आहे. मोनुसिंग जगदीशसिंग, मोहन सिंग जगदीशसिंग बावरी, सोनूसिंग जगदीशसिंग बावरी, जगदीश सिंग हरी सिंग बावरी, सत्कोर जगदीशसिंग बावरी, सर्व रा. (सद्गुरु कॉलनी शिरसोली नाका जळगाव) अशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या ५ जणांचे नाव आहेत.
या ५ जनाविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गु.र‌.नं. ७६९/२०२२ भा.द.वि कलम ३०२,३०७,३२४,१४३,१४७,१४८,१४९, १२०, ब प्रमाणे दि. २६-१०-२०२२ रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपीतांनी यापूर्वी टोळीने आर्थिक फायदासाठी बरेच गुन्हे केले आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर तशी नोंद आहे.
पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजन पाटील, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे, विरुद्ध दाखल गुन्ह्यात मोक्का कायदयाचे कलम वाढवणयासह प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पो.नि. जयपाली हिरे, यांनी तयार केलेला मोक्का प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्फत पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला. पो.अधिक्षक एम राजकुमार यांनी या प्रस्तावाचे अवलोकन तो प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्याकडे सादर केला.
या गुन्ह्यायंत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (||), ३ (४) (मोक्का) हे कलम लावण्याची परवानगी वरिष्ठ स्तरावरून मिळाल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील ५ आरोपीतांनवर मोक्का कायदाखाली कलम लावण्यात आले.
या प्रस्तावाच्या निर्माणकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजन पाटील यांच्यासह त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सहा. फौजदार युनूस शेख इब्राहिम, पो.हे.का. सुनील पंडित दामोदर, तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे, पो.उ.नि. रवींद्र गिरासे, सहा.अतुल वंजारी, पो.हे.का सचिन मुंडे, पो.ना योगेश बारी, पो.ना सचिन पाटील यांनी योगदान दिले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!