ताज्या घडामोडी

तारदाळ परिसर ग्रामीण पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शांतीनाथ मगदूम यांना _आदर्श_ शिक्षक पुरस्कार प्रदान

*तारदाळ परिसर ग्रामीण पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने
श्री शांतीनाथ मगदूम यांना _आदर्श_ शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले*
दानोळी प्रतिनिधी :संदीप चौगुले
खोतवाडी हायस्कूल खोतवाडी येथे गेली 23वर्षे गणित,विज्ञान विषयाचे अद्यापण विज्ञान प्रदर्शन गणित प्राविण्य परीक्षा, एनएमएमएस यामध्ये विद्यार्थी चमकावेत यासाठी त्याचे कायम विशेष मार्गदर्शन असते. या शिवाय इम्फायर अवॉर्डमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना राज्य स्तरापर्यंत फोहोचवले.ग्रंथालयाचे कामकाज.विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. शांतीसागर बहुउद्देशिय शिक्षण संस्थेचा शांतीगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त आहे
गेली 25वर्षे वारणा नदी काठ स्वच्छता मोहीम राबवत आहेत तसेच गावाची वेस इतिहास कालीन वास्तू आहे त्याची सुद्धा डागडुजी करून रंग देऊन जतन करण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये त्यांचे सहकारी मित्र रमेश डांग सर आणि इतर सहकारी मित्र आहेत.साई प्रतिष्ठान ने त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना साई प्रतिष्ठानचा स्वच्छ्ता गौरव पुरस्कार देखील देण्यात आला. वीर सेवादला कडून स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्याला खोतवाडी ग्रामपंचायत सदस्य,सर्व संस्थांचे पदाधिकारी व परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!