ताज्या घडामोडी

शिवपुराण कथेसाठी मुस्लिमाची जमीन फिरवला ४६ एकरवरील पिकावर नांगर; धार्मिक ऐक्याचे दर्शन

शिवपुराण कथेसाठी मुस्लिमाची जमीन

फिरवला ४६ एकरवरील पिकावर नांगर; धार्मिक ऐक्याचे दर्शन

परभणी, ता. ६ धार्मिक सहिष्णुता आणि बंधुभावामुळे विविधतेत एकता हे भारताचे सांस्कृतिक सूत्र उठून दिसते. विविध जाती धर्माच्या लोकांतील सलोखा हाच आपल्या देशाच्या ऐक्याचा पाया आहे. परभणीमध्ये आता हिंदू-मुस्लिम एकोप्याचे अनोखे उदाहरण समोर आले आहे. येथे १३ ते १७ जानेवारीदरम्यान होणान्या

सर्वधर्म समभावाची परंपरा आम्ही परभणीकर जपत आलो आहोत. काही दिवसांपूर्वी मुस्लिम धर्मीयांच्या कार्यक्रमासाठी अनेक हिंदू बांधवांनी सहकार्य केले होते. आता या शिवपुराण कथेसाठी त्यांनी पुढाकार घेतला. एकता, बंधुता हेच आमचे वैशिष्ट आहे. • संजय जाधव, खासदार, परभणी

शिवपुराण कथा या भव्य धार्मिक कार्यक्रमासाठी मुस्लिम तरुणाने पुढाकार घेत स्वतःची ६० एकर शेतजमीन विनामूल्य वापरासाठी दिली. एवढेच नाही तर यासाठी ६० पैकी ४३ एकर क्षेत्रातील तूर, साडेतीन एकरातील बहरलेल्या हरभरा पिकावर त्याने नांगर फिरविला.

परभणी येथे पंडित प्रदीप महाराज मित्रा यांची विख्यात शिवपुराण कथा होणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी  मुस्लीम असुन सुद्धा

सहन केले लाखोंचे नुकसान

■ हाजी शोएब यांनी प्लॉटिंग सोडून त्यांच्याच साठ एकरपैकी ४३ एकर क्षेत्रात तुरीचे पीक घेतले होते. ही जागा कथा आयोजनासाठी देऊ शकतो, असे त्यांनी खासदार संजय जाधव यांना सांगितले. परंतु, तुरीचे पीक कसे काढणार? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर शोएब यांनी कुठलाही विचार न करता ४३ एकरवरील तुरीसह साडेतीन एकरातील हरभरा पिकावर नांगर फिरविला आणि जागा साफ करून दिली. शिवाय इतरही १४ एकर जमीन दिली. हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांनी लाखो रुपयांचे नुकसान सहन केले.

देवाचे कार्य आहे हे समजल्यानंतर ते विना अडथळा पार पडले पाहिजे असे आमचा धर्म सांगतो. त्यामुळे या पवित्र कार्यात माझा व माझ्या कुटुंबाचाही सहभाग असावा यासाठी आमच्या कुटुंबाने हा निर्णय घेतला व जागा देऊ केली. – हाजी शोएब, परभणी

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!