ताज्या घडामोडी

ग्रामसभेत पाण्याचा प्रश्न उपस्थित केल्याने सामाजिक कार्यकर्ते सुनील ईघे यांच्या वर प्राण घातक हल्ला..

▪️ग्रामसभेत पाण्याचा प्रश्न उपस्थित केल्याने सामाजिक कार्यकर्ते सुनील ईघे यांच्या वर प्राण घातक हल्ला..

▪️पोलीस अधीक्षकांना निवेदन आरोपींनाङ अटक करण्याची मागणी..

सुबोध सावंत -नवी मुंबई प्रतिनिधी

संगमनेर – तालुक्यातील साकुर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील ईघे यांनी ग्रामसभेत पाण्याचा प्रश्न विचारल्याने गावगुंडांनी त्यांना लोखंडी राॅड आणि लाकडी दांडके तसेच लाथा बुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संबंधित आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी लोहार युथ फाऊंडेशन, आणि प्रदेश बारा बलुतेदार महासंघाच्या यांच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

सुनील ईघे हे संगमनेर तालुक्यातील साकुर येथे गोरगरीब आदिवासी दुर्बलांच्या हक्काचे रक्षणार्थ काम करणारे एक सामाजिक कार्यकर्ता असून साकुर गावातील पठार भागातील ठाकर या आदिवासी बांधवांचे या गावातील सत्ताधारी पुढार्‍यांनी राजकीय आकाशापोटी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद केला होता. आदिवासी बांधवांचे होणारे हाल थांबविण्यासाठी तो पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी वारंवार विनंती करून देखील सत्ताधारी शासकीय यंत्रणेने दखल घेतली नाही. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इघे यांनी ग्रामसभेत हा विषय मांडला असताना गुंड प्रवृत्तीच्या गाव गुंडांनी घाणेरड्या जातीवाचक शिव्या देऊन मारहाण केली आणि तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला तर गावातून हाकलून देऊ तुम्हाला गावातून बहिष्कार करू अशा धमक्या दिल्याची तक्रार घारगाव पोलीस स्टेशन येथे येऊन सुनील दिघे यांचे दोन सहकारी प्रभाकर कदम आणि बिलाल शेख माघारी परत असताना त्यांना देखील जीवघेणे मारहाण केली आहे. सुनील इघे यांची प्रकृती चिंताजनक असून ते संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.मात्र सदरच्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

यावेळी लोहार युथ फाउंडेशनचे मुख्य संघटक किशोर सोनवणे, माऊली मामा गायकवाड बारा बलुतेदार महासंघ जिल्हाध्यक्ष अहमदनगर, लोहार युथ फाउंडेशनचे संपर्कप्रमुख तथा युवक जिल्हाध्यक्ष सागर आगळे, मुख्य सल्लागार हर्षलजी आगळे, लोहार युथ फाउंडेशनचे सचिव नितेश लोखंडे, नितीन भाऊ पवार दक्षिण जिल्हाध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ, राजेंद्र लाड साहेब, लोहार युथ फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष संजय ईघे सर, अमोल जवणे, महिलाध्यक्षा ज्योतीताई हराळे, संघटक विजय हरिहर, दत्ता पोपळघट, अनिल हिवाळे, रवींद्र विघवे, संदिप पवार, विनायक गाडेकर, बाबासाहेब ईघे, सुनील हिवाळे, सागर पवार, किशोर पवार, प्रशांत जवणे, संतोष पवार, नामदेव गाडेकर, महेश पवार, बाळासाहेब इघे, अमर इघे, रमेश हरिहर, वाल्मीक इघे, भास्कर पोपळघट, मुकुंद इघे, अक्षय इघे, दिपक इघे, किरण पोपळघट, ज्ञानदेव इघे, सुनील इघे यांसह जिल्ह्यातील लोहार युथ फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदेश बाराबलुतेदार महासंघाचे पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!