ताज्या घडामोडी

रामेश्वर कॉलनीत जुन्या वादातून धारदार शास्त्राने हल्ला करणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली

रामेश्वर कॉलनीत जुन्या वादातून
धारदार शास्त्राने हल्ला करणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील दि. ०४/१२/२०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिरा प्रियंका दुकाणाच्या बाजूला रामेश्वर कॉलनी जळगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरुन नितीन निंबा राठोड, व सचीन उर्फ कोड़ा, कैलास चव्हाण रा. रामेश्वर कॉलनी जळगाव यांच्यावर तुशार ईश्वर सोनवणे २. नयन उर्फ उदय अविनाश येवले, ३. प्रतिक ज्ञानेश्वर पांडुळे ४ विशाल संजय पवार व अल्पवयीन बालक यांनी धारदार हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर सदर बाबतीत कैलास विश्राम चव्हाण यांनी पोलीस स्टेशनला दिल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपी हे पसार झाले होते. त्यांचा शोध सुरु होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. पोलीस अधिक्षक जळगांव श्री एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक श्री चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदिप गावीत यांनी गुन्ह्याचा तपास व आरोपी शोध घेण्यात सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सम्राट कॉलनी येथून तुशार ईश्वर सोनवणे, वय १८ वर्षे, रा. मेहन जळगाव पास, रामेश्वर कॉलनी येथून प्रतिक ज्ञानेश्वर पांडुळे वय १९ वर्ष, रा. स्वामी समर्थ केंद्राजवळ रामेश्वर कॉलनी जळगाव पास व गुलाब बाबा कॉलनी, जळगाव येथून नयन ऊर्फ उदय अविनाश देवानं वय १९ वर्ष रा गुलाब बाबा कॉलनी, जळगाव यास दिनांक ०६/१२/२०१२ रोजी रात्री ताब्यात घेवून अटक करण्यात आली होती. स्यांना आज रोजी मा. न्यायममुती श्रीमती जे. एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. १२/१२/२०२२ रोजीपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. सरकारतर्फे अंडव्होकेट श्रीमती स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले. सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, गोविंदा पाटील, विकास मालदिये, संदिप धनगर, किरण पाटील अशांनी केली आहे. इतर आरोपीतांचा शोध सुरु आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!