ताज्या घडामोडी

मनिपुर मध्ये महिलांवर अत्याचाराच्या निषेधार्थ जाहीर निदर्शने

निवेदन
मा.तहसीलदार साहेब
येवला तहसील कार्यालय येवला
ता.येवला जि. नाशिक

विषय:–मनिपुर मध्ये महिलांवर अत्याचाराच्या निषेधार्थ जाहीर निदर्शने

मा.महोदय
आम्ही वरील विषयानुसार निवेदन सादर करतो की मनिपुर मध्ये देशाला काळीमा फासणार्या घटना घडत आहे अनेक महिलांवर बलात्कार करून अमानवीय कृत्य करत आहे त्या मध्ये कारगील युद्धात असणार्या जवानांच्या पत्नीवर देखील बलात्कार करण्यात आला दोन महीलांची नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली असे घृणास्पद आणि लाजीरवाणे प्रकार त्या ठिकाणी घडत असताना त्या ठिकाणच्या राज्य सरकार व सत्ताधारी गप्प कसे बसु शकतात त्याची किव येते अशा कठोर प्रवृत्तीच्या राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो हे सर्व ऐकून मन सुन्न होते जर असेच चालले तर लोकशाही वरील लोकांचा विश्वास राहणार नाही एकीकडे आपल्या देशाच्या महामहीम राष्ट्रपती महीला आहे तर दुसरीकडे आपल्या देशात दिवसा ढवळ्या महिलांचा ईज्जतीची लचके तोडली जात आहे म्हणून अशा घटनेचा पक्षाच्या वतीने पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विंचुर चौफुलीवर जाहीर तीव्र शब्दात निषेध नोंदवित आहेत

मागण्या खालीलप्रमाणे

1)सदर घटनेतील आरोपीना फाशीची शिक्षा द्या
2)घटनास्थळी सखोल तपास करून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करण्यार्णावर कठोर कारवाई करा
3)बघ्याची भुमिका घेणार्या पोलीस व पोलिस आधीकारी यांना तात्काळ निलंबित करा
4)मनिपुर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा
5)मनिपुर राज्य सरकार तात्काळ बरखास्त करा

सुरुवातीला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महीला आघाडी च्या नेत्या सौ.उषाताई पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व स्मारकाच्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आले यावेळी बाळासाहेब आहिरे बाळासाहेब गायकवाड आशा आहेर अॅड स्मिता झाल्टे यांची भाषणे झाली
यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे यांनी मनिपुर सरकार वर जोरदार टिका करताना म्हणाले की एकीकडे महामहीम राष्ट्रपती महीला आहे तर दुसरीकडे आपल्या देशात दिवसा ढवळ्या महिलांचा ईज्जती लुटल्या जात आहे कारगील युद्धात असणार्या जवानांच्या पत्नीवर देखील बलात्कार केला जातो तरी देखील मनिपुर सरकार शांत कसे म्हणून तेथील सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा व राष्ट्रपतीराजवट लागू करा आरोपींना फाशीची शिक्षा द्या असे मागणी करत पगारे यांनी तीव्र शब्दात जाहीर निषेध केला यावेळी जोरदार घोषणा बाजी करून संपुर्ण परिसर दणाणून सोडला होता
यावेळी तहसीलदार श्री. आबा महाजन साहेब व पोलिस उप निरीक्षक श्री सुरज मेढे साहेब यांनी निवेदन स्विकारले
आपला विश्वासू
महेंद्रभाऊ पगारे विजय घोडेराव हमजाभाई मनसुरी अजिजभाई शेख बाळासाहेब आहीरे विनोद त्रिभुवन मयुर सोनवणे नवनाथ पगारे बाळासाहेब गायकवाड महेंद्र खळे विजय पगारे बाळासाहेब सोनवणे समाधान गुजाळ गणपत पवार गौतम पगारे सोमनाथ मोरे दादासाहेब मोरे आशाताई आहेर अॅड स्मिता झाल्टे ज्योती पगारे नयना सोनवणे अलका घोडेराव उषा पगारे पार्बताबाई पगारे वैशाली मावस याच्या सह अनेक महिला व पुरुष मोठा सख्येन उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!