ताज्या घडामोडी

कुटुंबाला चिरडले; युवती ठार, ६ गंभीर जखमी

दर्ग्याला जाताना ट्रकने रिक्षात बसलेल्या अख्ख्या कुटुंबाला चिरडले;
युवती ठार, ६ गंभीर जखमी

सुबोध सावंत -नवी मुंबई प्रतिनिधी

सोलापूर : सोलापूर शहरात पुन्हा एक मोठा अपघात झाला आहे. शुक्रवार असल्याने अख्खं कुटुंब शहरातील शाहजहूर येथील दर्ग्याला दर्शनासाठी रिक्षातून जात होते.
पण सुसाट धावणाऱ्या ट्रकने शहरातील शेळगीजवळ असलेल्या मार्गावर रिक्षाला चिरडले.
या भीषण अपघातात एक युवती जागेवरच ठार झाली.
मिसबा शुकुर मुलानी
(वय १४ वर्ष, रा. आदर्श नगर, शेळगी परिसर, सोलापूर शहर)
असे मृत युवतीचे नाव आहे.
भीषण अपघातात कुटुंबातील इतर सदस्य गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रुकसाना कोरबू (वय ४५ वर्षे ),
जन्नत कोरबु (२० वर्षे),
हसीना शब्बीर कोरबु
(वय २५ वर्ष),
अलिम शुकूर कोरबू (वय ३ वर्षे),
नौशाद सुरज कोरबू
(वय २५ वर्षे), मुजिर पठाण
(वय २४ वर्ष),
मोहम्मद साद (वय ७ वर्षे) असे जखमींचे नाव आहेत.
शुक्रवार असल्याने दर्ग्याकडे निघाले होते मुस्लिम समाजातील नागरिक दर गुरुवारी व शुक्रवारी वेगवेगळ्या दर्ग्याला जाऊन दर्शन घेत असतात.
असेच एक कुटुंब दुपारी नमाजनंतर दर्ग्याकडे दर्शनासाठी निघाले होते.
पण वाटेतच मालट्रकने
(क्रमांक- एम.एच. 43 बी.पी. 8788)
रिक्षा (क्रमांक- एम.एच. 13 ए.एफ. 2209) ला चिरडले. यामध्ये रिक्षाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.
रिक्षा चालक देखील गंभीर जखमी झाला.
त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची व नागरिकांची मोठी गर्दी शेळगी येथे रिक्षाचा मोठा अपघात झाल्याची माहिती माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली.
तसेच शहरातील इतर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
रुग्णालयात डॉक्टरांची एकच धांदल उडाली होती.
पोलिसांनी ज्यादा कुमक मागवून गर्दीला हटविले.
सामाजिक कार्यकर्त्यांनी या अपघातानंतर अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!