ताज्या घडामोडी

एम. एस. जी. एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा.

एम. एस. जी. एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा.
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस अमोल सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मेजर पृथ्वीराज देशमुख हे होते. कार्यक्रमाची सुरुवात पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. यानंतर स्कुलचे प्रिंसिपल अल्ताफ खान यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष लावणे गरजेचे आहे.ग्लोबल वार्मिंग नियंत्रण राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहीजे.याप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस अमोल सोनवणे यांनी रोपटे व कुंड्या स्कुलला भेट म्हणून दिली.
याप्रसंगी इ. १०वि अंदरसुल केंद्रात द्वितीय क्रमांक पटकावणारी स्मिता देशमुख, अमोल आहेर,गणेश सोनवणे,सचिन घोडके,माधुरी माळी, सुनीता वडे, शर्मिला पवार, अर्चना एंडाइत, अनिता लाचुरे सह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजहर खतीब यांनी तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!