ताज्या घडामोडी

मुंबईत राजगृह येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.भावना गवळी, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेतली. “राजगृहा”त जतन केलेल्या बाबासाहेबांच्या काही वस्तू त्यांना दाखवल्या. यावेळी इंदू मिल येथे प्रस्तावित स्मारकाबाबत त्यांनी चर्चा केली.

आज मुंबईत राजगृह येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.भावना गवळी, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेतली. “राजगृहा”त जतन केलेल्या बाबासाहेबांच्या काही वस्तू त्यांना दाखवल्या. यावेळी इंदू मिल येथे प्रस्तावित स्मारकाबाबत त्यांनी चर्चा केली.

२००३ ला संयुक्त राष्ट्रात (डरबन, द. आफ्रिका) सामाजिक अजेंड्यावर भारत सरकारला पराभव स्वीकारावा लागला होता. त्या परिषदेला मी उपस्थित होतो. सामाजिक मुद्द्यांवर ती परिषद झाली होती. त्यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी याबद्दल माझ्याकडे विचारणा केली होती. त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की, भारताकडे आंतरराष्ट्रीय विश्लेषण करणारी कोणतीही संस्था नाही. केवळ परराष्ट्र खातं आहे. त्यामुळे जगाची जी अपेक्षा होती ती सरकारपर्यंत पोहोचली नाही. अशा प्रकारची संस्था उभी राहत नाही तोपर्यंत भारत सरकारचा पराभव होत राहील असे मी त्यांना सांगितले होते.

त्याचवेळी पंतप्रधान वाजपेयींनी इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या नावाने आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्र उभारावे व त्याचा संपूर्ण खर्च केंद्रसरकार करेल अशा आशयाची नोट तयार केली. त्या नोटची मी मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली. काँग्रेस,भाजपच्या काळात आतापर्यंत हे शक्य झालेले नाही. आपल्या कार्यकाळात आपण त्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांना सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याची जबाबदारी मंत्री दीपक केसरकर यांना दिली. व पुढील आठ दिवसात अहवाल सादर करायला सांगितला. इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर उभं राहिलं अशी अपेक्षा.

Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Deepak Vasant Kesarkar

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!