ताज्या घडामोडी

१० हजार रुपये किंमतीच्या मोबाईल हिसकावुन लंपास; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

१० हजार रुपये किंमतीच्या मोबाईल हिसकावुन लंपास; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल जवळ विद्यार्थ्यांच्या हातातून १० हजार रुपये किंमतीच्या मोबाईल अज्ञात दोन जणांनी जबरी हिसकावून लंपास केल्याची घटना मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता घडली.
या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलिसांनी दिलेली माहिती अनुसार. अक्षदा मुकेश कुलकर्णी (वय – १९) रा. एस.एम.आय टी कॉलेज जवळ जळगाव, ही विद्यार्थिनी मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता शहरातील एम जे कॉलेज परिसरातील ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल जवळ आले. त्यांनी तिच्या हातातील १० हजार रुपये किंमतीच्या मोबाईल अज्ञात व्यक्तीने जबरी हिसकावून लंपास केला. तरुणीने आरडा ओरड केली. तोपर्यंत दोघे पसार झाले होते. विद्यार्थिनीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून दुपारी ४ वाजता अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!