ताज्या घडामोडी

*कु.सुजाता महेंद्र पगारे हीचे विचार प्रेरणादायी*

*कु.सुजाता महेंद्र पगारे हीचे विचार प्रेरणादायी*

सुजाता पगारे ही अनकुटे येथील ग्रामीण भागातील मुलगी असुन ती सावरगाव येथे नु इग्लिश स्कूल सावरगाव या शाळेत सायकल वर जाऊन 8 वी च्या वर्गात शिक्षण घेत आहे मुळातच शेतकरी कुटुंबातील सुजाता असुन तिचे वडील हे आंबेडकरी चळवळीत सक्रिय कार्यकर्ते असुन सध्या अनकुटे सावखेडे सोसायटीचे चेअरमन आहे त्यामुळे घरी नेहमी लोकांची वर्दळ असते किती तरी गोर गरीब शोषित पिडीत महिलांच्या व्यथा ह्या सुजाता नेहमी ऐकते त्यामुळे तिने तिच्या वाढदिवसाला विरोध केला तिने तिच्या आई वडिलांना आग्रह धरला कि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोर गरीब विधवा महीलांना दिवाळी भेट काही तरी द्या त्यासाठी तिने स्वता शेतात कामं करून व तिचे जवळचे असे 3500रू वडिलांना दिले मला कपडे व केक वगैरे घेऊ नका ते पैसे यात टाकून गरीब महिलांना मदत करू असे ऐकल्यावर तिच्या वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता चांगल्या प्रकारच्या साड्या मिठाई व दिवाळी फराळ वाटप करण्यासाठी खरेदी केले व तिच्या हातानेच गरजू महिलांना ते वाटप केले त्या वेळेस त्या महिलांचा व्यथा ऐकून अश्रू आवरता आले नाही काही महीलांनी दिपावली सण साजरा केलाच नाही त्या महिलांनी सुजाताला जवळ घेऊन आपलंस करत मन भरून आशिर्वाद दिले सुजाताच्या आग्रहा मुळे हा उपक्रम करता आला तीचा आदर्श इतरांनी ही घ्यावा शेवटी मुलगी ही आमच्या परिवारासाठी प्रेरणादायी ठरली असे गोरऊद्दगार सुजाताच्या आई वडिलांना यावेळी काढले असे उपक्रम तरूणांनी हातात घेऊन गोर गरीबांना मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन सुजाताने केले आहे यावेळी सुजाताची आई ज्योती पगारे वडील महेंद्र पगारे भाऊ युवराज पगारे उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!