ताज्या घडामोडी

दिपावली सुर संध्या कार्यक्रम साजरा*

*दिपावली सुर संध्या कार्यक्रम साजरा*

*सुहास पांचाळ / पालघर जिल्हा प्रतिनिधी*

वसई /निर्मळ : वसई निर्मळ येथील जीवन विकास मंडळातर्फे वसईत दिवाळी निमित्त ‘दिपावली सुर-संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता समाज सेवा मंडळ, निर्मळ येथे झालेल्या या कार्यक्रमात वसई परिसरातील उभरत्या गायक-गायिका आणि वादकांचा सहभाग होता, त्यांनी गायलेल्या जुन्या मराठी-हिंदी सदाबहार गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संगीत संयोजन सुशील पेंढारी, स्वरयात्रा ग्रुप यांनी केले तर आपल्या बहारदार निवेदनाने सॅबी परेरा यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाचे स्वागत-प्रास्ताविक जॉन टी. परेरा ह्यांनी व आभार प्रदर्शन ख्रिस्तोफर रिबेलो ह्यांनी केले. विनामूल्य असलेल्या ह्या संगीत मैफिलीत रसिक प्रेक्षकांनी बहुसंख्येने सामील होऊन सप्त सुरांत न्हाऊन दिवाळीचा आनंद साजरा केला, मंडळातर्फे प्रेक्षकांचे आभार मानण्यात येत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!