ताज्या घडामोडी

वसई-विरार शहरातील नागरिकांना खड्ड्यात ठेऊन प्रशासन महापौर मॅरेथॉन साठी रस्ते सजावणार असेल तर भारतीय जनता पार्टी सजवलेले रस्ते उखडून टाकेल*

*वसई-विरार शहरातील नागरिकांना खड्ड्यात ठेऊन प्रशासन महापौर मॅरेथॉन साठी रस्ते सजावणार असेल तर भारतीय जनता पार्टी सजवलेले रस्ते उखडून टाकेल*

*वसई-विरार शहर जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील गंभीर यांचा इशारा.*

*सुहास पांचाळ / पालघर जिल्हा प्रतिनिधी*

नालासोपारा / दि. : २०.१०.२२ : वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने महापौर मॅरेथॉन स्पर्धा घेण्यापूर्वी वसई-विरार शहरातील रस्ते दुरुस्त करून चकाचक नाही केले तर भारतीय जनता पार्टी मॅरेथॉन स्पर्धेसाठी सजवलेले रस्ते उखडून टाकेल अशा गंभीर इशारा भारतीय जनता पार्टीचे वसई -विरार शहर उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासन दरवर्षी महापौर स्पर्धा घेते. या स्पर्धेसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च होतो. प्रत्येक वर्षाच्या अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद केली जाते. यानिमित्त शहरातील रस्ते सजवले जातात. रस्त्यावर नव्याने डांबरीकरण करून रंगरंगोटी केली जाते. रस्ते पाण्याने स्वच्छ धुतले जातात. यांवर लाखो रुपयांचा खर्च होतो. लाखोंचा खर्च करून सेलिब्रिटी बोलावले जातात. सध्या संपूर्ण वसई-विरार शहर खड्डेमय झाले आहे. जनतेने गणेशोत्सव खड्ड्यात साजरा केला, नवरात्रौत्सव खड्ड्यात साजरा केला. जनतेचा दसराही खड्ड्यात गेला आणि आता दिवाळीही देखील जनतेला खड्ड्यात साजरी करावी लागणार आहे. दरम्यानच्या काळात पालिकेच्या ठेकेदारांनी शहरातील रस्त्यांची डागडुजी केली. मात्र अत्यंत निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे अवघ्या काही दिवसात शहरातील रस्ते उखडून गेले आणि ठेकेदार मात्र मालामाल झाले असा गंभीर आरोप जितेंद्र पाटील यांनी केला आहे. एकीकडे प्रशासन रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करीत नाही तर दुसरीकडे मात्र मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्त रस्ते सजवण्यासाठी लाखोंचा खर्च केला जातो यावर भारतीय जनता पार्टीने तीव्र आक्षेप घेतला आहे.
वसई-विरार शहरातील सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये संताप आणि प्रचंड असंतोषाची भावना व चीड उफाळून आली असून वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने महापौर मॅरेथॉन स्पर्धा घेण्यापूर्वी वसई-विरार शहरातील रस्ते दुरुस्त करून चकाचक केले नाही तर भारतीय जनता पार्टी मॅरेथॉन स्पर्धेसाठी सजवलेले रस्ते उखडून टाकेल अशा गंभीर इशारा भारतीय जनता पार्टीचे वसई -विरार शहर उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी वसई-विरार शहर प्रशासनाला दिला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!