ताज्या घडामोडी

फडणवीसांना विठ्ठलाचा असाही आशीर्वाद, आषाढीनंतर कार्तिकी पुजेचा मान, देवेंद्रांच्या नावावर विक्रम……

फडणवीसांना विठ्ठलाचा असाही आशीर्वाद,
आषाढीनंतर कार्तिकी पुजेचा मान,
देवेंद्रांच्या नावावर विक्रम……

सुबोध सावंत :-नवी मुंबई प्रतिनिधी
पंढरपूर : यंदा कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असून मंदिर समितीकडून फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले असल्याचे समिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
यामुळे विठ्ठलाची आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही वेळी महापूजा करण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळणार आहे.
आषाढी व कार्तिकी या दोनही महापूजेचा मान मिळविणारे फडणवीस हे पहिले राजकारणी ठरणार आहेत.
परंपरेनुसार आषाढीची शासकीय महापूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते.
यावर्षी नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीची महापूजा केली होती.
आता या सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान मिळणार आहे.
फडणवीस हे राज्यातील पाहिले राजकारणी असतील ज्यांना आषाढी व कार्तिकी या दोन्ही शासकीय महापूजा करण्याचा योग्य येणार आहे.
यापूर्वी २०१४ ते २०१९ या काळात एक वर्षाचा अपवाद वगळता फडणवीस यांनी चार वेळा आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली होती. यात २०१८ मध्ये मराठा आंदोलन सुरु असताना आंदोलकांनी विरोध केल्यामुळे फडणवीस यांनी मुंबई येथील वर्षा बंगल्यावर आषाढीची महापूजा केली होती. पण आता पुन्हा फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यामुळे ते पहिल्यांदाच कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करणार आहेत.
यामुळे आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही शासकीय महापूजा करण्याचा मान मिळणारे फडणवीस पहिलेच राजकारणी ठरणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!