ताज्या घडामोडी

चाकु हल्ल्यातील दोघे फरार तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली

*पोलीस* *टाईम्स* 🚔🚔

चाकु हल्ल्यातील दोघे फरार तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत केस मागे घेण्यास नकार दिल्याने संतापाच्या तरुणावर चाकू हल्ला करणाऱ्या वरील गुन्हेगारासह त्याच्या साथीदारास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे!
सनी उर्फ फौजी बाळकृष्ण जाधव, आणि सचिन उर्फ कोंडा, केलास चव्हाण, दोघे राहणार आदित्य चौक रामेश्वर कॉलनी जळगाव अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दि १२ ऑक्टोबर रोजी रात्री ८:०० व वाजेच्या सुमारास तुषार ईश्वर सोनवणे रामेश्वर कॉलनीतील रहिवासी तरुण, जैन व्हेलीच्या दिशेने त्याच्या मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जात होता. वाटेत सनी जाधव, शुभम पाटील, सचिन कोंडा आणि गोलू चौधरी, अशा चौघांनी त्याला अडवले. आपल्या विरुद्ध दाखल केलेली केस मागे घे असे सनी जाधव यांनी तुषार सोनवणे यास म्हटले होते. केस मागे घेण्यास तुषार सोनवणे यांनी नकार दिला. त्यामुळे संतापाच्या भरात सनी जाधव यांनी तुषारच्या हातावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात तुषार जखमी झाला. दरम्यान सनी सोबत असलेल्या इतरांनी तुषार यास चापटा बुक्क्यांनी यांनी मारण केली. या घटने प्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सनी फौजी बाळकृष्ण जाधव आणि सचिन उर्फ कोंडा केलास चव्हाण या दोघांना पो.नि. प्रताप शिकारे यांच्या निर्देशाखाली पथकाने अटक केली आहे. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.का. जितेंद्र राठोड, पो.ना. सैय्यद इम्रान, किशोर पाटील, सचिन पाटील, शुध्दोधन ढवळे, आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. सदरच्या गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होते. सनी जाधव हा एमआयडीसी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध मारामारी, दरोड्याच्या प्रयत्न, घरात घुसून अश्लील, शिवीगळ करणे, यासारखे एकूण दहा गुन्हे दाखल आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!