ताज्या घडामोडी

मानव जातीचा पालन कर्ता फक्त एकच – या त्याच्याशी नातं जोडू या*

*मानव जातीचा पालन कर्ता फक्त एकच – या त्याच्याशी नातं जोडू या*

जळगाव प्रतिनिधी शाहिद खान

वहिदत ए इस्लामी तर्फे *पालन कर्त्याशी नात जोड़ा* या मोहीमेची सुरवात संपूर्ण भारतात २ ऑक्टोबर ला सुरुवात झाली होती व आज 16 ऑक्टोंबर रोजी त्या मोहिमेचा समारोप होता. जळगावत सुद्धा या मोहिमेचा समारोप राष्ट्रीय महामार्ग जवळील हॉटेल मिनार येथे करण्यात आला.

अंतिम प्रेषित मोहम्मद (स) यांच्या जयंतीनिमित्ताने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते मोहिमेचा समारोप प्रमुख वक्ते दावा विभागाचे प्रभारी अब्दुल वहाब मलिक यांच्या व्याख्यानाने करण्यात आला.
यावेळी जळगाव शहरातील आमंत्रित 110 सर्व धर्मीय बांधवांची उपस्थिती होती. व्यासपीठवार अब्दुल वहाब सोबत हनीफ हुदाई,अब्दुल रहीम फलाही व मुस्तफा शेख यांची उपस्थिति होती.

मलक यांनी आपल्या भाषणात ईश्वर,प्रेषित, इस्लाम व मृत्यूनंतर जीवन या विषयावर सविस्तर अशी माहिती सादर केली. पृथ्वीतलावरील संपूर्ण मानव जातीने आपले परमेश्वर, पालनहार व सृष्टीचे चालकाला जाणून घ्यावे व त्याच्याशी कशा प्रकार नातं जोडावे म्हणून अनेक उदाहरण सांगितले. आपल्या भाषणात पुढे म्हणाले की या संपूर्ण जगात जी काही परिस्थिती निर्माण होत आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे आपण आपल्या पालनहारची आज्ञा जाणून घेत नाही व त्याचे तंतोतंत पालन करत नाही आणि म्हणूनच मनुष्य मनुष्याला गुलाम बनवण्याच्या प्रवृत्तीकडे वाटचाल करीत आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भुसावळचे हनीफ हुदाई, यांनी सादर केले तर सूत्रसंचालन मुस्तफा शेख व आभार अतीक शेख यांनी व्यक्त केले.
भाषणाच्या शेवटी उपस्थितांनी प्रमुख वक्ते यांना प्रश्न विचारले असता त्यात प्रामुख्याने अंतिम प्रेषितांची बहुपत्नीत्व,जीवन चरित्र बाबत इस्लाममध्ये हिजाब व बुरख्या संबंधी असलेले समज गैरसमज तसेच परलोक जीवन व स्वर्ग नरक याबाबत प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी उपस्थितांना दिली.

फोटो
उपस्थित जनसमुदायस मार्गदर्शन करतांना अब्दुल वहाब मलक सोबत हनीफ हुदाई,अब्दुल रहीम फलाही व मुस्तफाआदि दीसत आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!