ताज्या घडामोडी
कोल्हापूर सह सांगली आणि सातारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; कोयना धरणापासून 20 किमी अंतरावर धक्के*
ब्रेकींग…..
*कोल्हापूर सह सांगली आणि सातारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; कोयना धरणापासून 20 किमी अंतरावर धक्के*
कागल प्रतिनिधी
अजिंक्य जाधव
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज (16 ऑगस्ट) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज (16 ऑगस्ट) सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.