ताज्या घडामोडी

अल्पसंख्यांक समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत कुलजमाती कौन्सिल जळगाव तर्फे मूक धरणे आंदोलन

प्रतिनिधी शाहिद खान

भारतातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाबाबत भारत भरात होत असलेल्या अन्यायाबाबत तसेच जळगाव जिल्ह्यात पोलीस दलामार्फत न्यायिक कारवाई न होणे बाबत जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाबाहेर शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ते५ वाजे दरम्यान जळगाव शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील समाज बांधवांनी एकत्रित येऊन कुल जमाती कॉउंसिल जळगावच्या बॅनरखाली मूक धरणे आंदोलन करून केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे.

जिल्हाधिकारी जळगाव मार्फत केंद्र शासनाच्या मागण्यासाठी महामाहिम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू व राज्य शासनाच्या मागण्यासाठी माननीय भगत सिंग कोषयारीजी, राज्यपाल महोदय यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून निवेदनाच्या प्रती मा. पंतप्रधान,मा.मुख्य न्यायाधीश,सर्वोच्च न्यायालय, चेअरमन, मानव अधिकार राष्ट्रीय व राज्य आयोग तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक जळगाव यांना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत

कुल जमाती तर्फे केंद्रशासन व राज्य शासन यांना सादर केलेले निवेदनातील प्रमुख मागण्या

केंद्रशासन:-
१) ज्या व्यक्तींनी दहशतवाद कारवायांमध्ये सहभाग घेतला अथवा कृत्या मध्ये सामील झाले, समर्थन दिले, दहशतवाद घडवण्यासाठी आर्थिक मदत केली त्या व्यक्तींच्या विरोधात सरकारने यूपीए अंतर्गत कारवाई करावी परंतु सरसकट सामाजिक संघटना पी एफ आय व तिच्या सोबतच्या आठ संघटनांवर पाच वर्षासाठी दहशतवादी संघटना म्हणून आणलेली बंदी त्वरित उठवावी व त्या संघटनेला न्याय द्यावा
२)नुपूर शर्मा हीच्यावर त्वरित अटकेची कारवाई करावी.
३) धर्मसंसद द्वारे मुस्लिम समाजाला आवाहन करणाऱ्या संबंधिताना अटक करून कारवाई करावी.
४) सीएए व एनपीआर हे कायदे त्वरित रद्द करावे.
५) केंद्रीय मंत्रिमंडळात मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यावे.
६)पंतप्रधान १५ कलमी अल्पसंख्यांक समाजा बाबत योजनेची पूर्तता करावी
७)अल्पसंख्यांक मंत्रालया च्या अहवालानुसार मुस्लिमांना शिक्षा व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यावे.
८) मॉब लिंचिंगच्या विरोधात कायदा करावा व मोबलिंचींग करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी.

राज्य शासन:-
१) जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील अल्पसंख्यांक अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी भादवी ३०७ सह पोक्सो ची कलमे लावून त्वरित दोषारोपण पत्र सादर करावे.( पहुर पोलीस स्टेशन एफ आय आर क्रमांक ३३२/२२ )
२) जळगाव शहरातील हॉटेल गोल्डन नेस्ट मध्ये मुस्लिम तरुणाला लव जेहादच्या नावाखाली मारहाण करून गंभीर दुखापत केल्याबाबत भादवी ३०७ सह १५३(अ) व (ब)कलम लावून गुह्यातील आरोपी क्रमांक एक शोभा चौधरी व बाकी फरार तरुणी यांना त्वरितअटक करावी.( रामानंदनगर पोलीस स्टेशन एफ आय आर क्रमांक २९०/२२)

३)शिरसोली गावात मुस्लिम तरुणाला गंभीर रित्या जखमी करून मारहाण केल्याबाबत ओंकार न्हावी वर भादवी ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल होणे आवश्यक असताना फक्त ३२६ कलम लावले. जख्मी अद्याप दवाखान्यात एडमिट आहे.( एमआयडीसी पोलीस स्टेशन एफ आय आर क्रमांक ७११/२२)

४)२६ सप्टेंबर २२ च्या दैनिक सकाळ मधील अंकात प्रसिद्ध झालेल्या ममुराबाद रोड वरील, बेंडाळे चौकातील व खंडेराव नगरातील समाजकंटक जे मुस्लिम समुदायावर हल्ले करीत आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी.
५) मुंबईतील दाखल गुन्ह्या संदर्भात दहशतवादी कारवाया अंतर्गत जळगाव शहरातील तरुणांवर दहशत पसरून अटक करू नये पुरावे असल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी.

नवीन जिल्हा अधिकारी “अमन” यांना शांती ची विनंती

नवीन जिल्हा अधिकारी अमन मित्तल यांच्याशी शिष्ट मंडळाच्या वतीने फारूक शेख यांनी सविस्तर पणे निवेदना चा सार सांगत असतांना त्यांनी ते गम्भीरता पूर्वक एकून नक्कीच आपणास जळगाव बाबतीत न्याय मिळवून देईल असे आश्वासित केले तेव्हा शेख यांनी त्यांना संबोधले की आपल्या अमन नावा प्रमाणे( अमन म्हणजे शांती) शांती आणून मुस्लिम समाज जो स्वतःला असुरक्षित समजत आहे त्याला सुरक्षा प्रदान करावी अशी विनंती केली.

मुक धरणे आंदोलनात यांचा होता सहभाग
कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, शहर काजी मुफ़्ती अतिकुर रहेमान, सचिव व वहिदत इस्लामी चे डॉक्टर जावेद शेख, शाहूनगर मशीद ए नूर चे मौलाना अख्तर नदवी, जमात ए इस्लामी चे अध्यक्ष सोहेल अमीर ,,शाहबिरादरीचे तोफिक शाह, सह सचिव तथा कासमवाडी मस्जिद चे इकबाल मिर्झा, एम पी जे आरिफ देशमुख,जमीयत उलमाचे हाफिज अब्दुल रहीम, मनियार बिरादरीचे फारुख शेख, ताहेर शेख, ईदगाह ट्रस्ट चे अनीस शाह, एम आय एम चे अहमद सर, दानिश खान, व रय्यान जहागीरदार ,शिकलगार बिरादरीचे अन्वर खान, राष्ट्रवादीचे मझहर खान, समाजवादी चे रईस बागवान, कांग्रेस चे रईस शेख,बाबा देशमुख, शिवसेनेचे जाकिर पठाण व मतीन सैयद,नगरसेवक रियाज़ बागवान,प्रतिनिधि अकरम देशमुख व हाजी यूसुफ, रिज़वान जागीरदार, सेवा निवृत्त नासेर पठान, समाज सेवक ज़िया बागवान, अनम फाउंडेशन चे शाहिद सैयद, रहमान या फाउंडेशनच हाफिज़ शफी रहमानी, मौलवी निजाम,मौलवी रोशन, अलहिंद चे अल्ताफ शेख,अल खैर चे यूसुफ शाह,अक्सा चे आमिर शेख,अर्शद पठान ,सैयद दानिश, वाहिदत चेआतिक शेख, एमपीजे चे महेमूद शेख,फहीम पटेल,ताहेर शेख,फारूक पटेल,असलम पटेल, याकूब बांगी… आदींची उपस्थिती होती

निवेदन व शिष्ट मंडल
जिल्हाधिकारी जळगाव अभिजीत राऊत यांना धरणे आंदोलन करून एका शिष्टमंडळाने दोन्ही निवेदन सादर केले
या शिष्टमंडळात सौ जैनब पटेल, सौ नाज़िया शेख,सय्यद चांद ,मुफ़्ती अतिकुर रहेमान,सोहेल अमीर,मौलाना अख्तर नदवी,फारूक शेख ,कांग्रेस चे बाबा देशमुख,राष्ट्रवादी चे मज़हर खान,समाज वादीचे रईस बागवान,शिवसेने चे मतीन सैयद ए एम आय चे अहमद सर,रियाज़ बागवान,अकरम देशमुख,सैयद शाहिद,अनवर खान,याकूब बांगी यांचा समावेश होता.

 

फोटो कैप्शन
१) मूक धरणे आंदोलन करतांना आंदोलन करते
२)जिल्हाअधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देताना शिष्ट मंडल
३) निवेदन दिल्यावर जिल्हा अधिकारी कार्यालयात उपस्थित शिष्टमंडल

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!