ताज्या घडामोडी

जळगाव शहरात एमआयडीसी पोलीस निरीक्षक,प्रताप शिकारे आपणास…….

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरात एमआयडीसी पोलीस निरीक्षक,प्रताप शिकारे आपणास अवगत करू इच्छितो की चोपडा शहर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी आली असून अमुक अमुक ठिकाणाहून मुले पळवून नेली असल्याबाबत समाज माध्यमावर संदेश फिरत असल्याचे निदर्शनात आले आहे संदेश काळजी पूर्वक बघितले असता जवळपास सारखेच असून केवळ गाव, शाळा, मुलाचे नाव बदललेले दिसून येत आहे
एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत कोणताही अनुचित प्रकार आढळून आलेला नाही तसेच एमआयडीसी पोलीस स्टे.चे मागील काही वर्षाचा रेकॉर्ड देखील चेक केले आहे अशा कोणत्याही अप्रिय घटनेची नोंद नाही तसेच फिरत असलेल्या संदेशानुसार महाराष्ट्रात कुठे गुन्हे दाखल असल्याचे देखील ऐकवत नाही मागे देखील काही वर्षांपूर्वी असेच संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे काही ठिकाणी निर्दोष लोकांना मारहाणीच्या घटना देखील महाराष्ट्रात घडल्याचे दिसून येत आहे काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे
तरी पोलीस प्रशासन म्हणून आम्ही सदर संदेशाबाबत गंभीर असून शाळेच्या ठिकाणी साध्या गणवेशात गस्त यापूर्वीच सुरू केली आहे तसेच शाळा प्रशासनाशी संपर्क करून त्यांना देखील सतर्क व सजग राहण्याचे व खबरदारी बाळगण्याचे कळवित आहोत
याद्वारे मी जबाबदारीने सर्व जनतेस व पालकांना आवाहन करू इच्छितो की सदर प्रकाराबाबत दक्ष राहणे गरजेचे असले तरी विनाकारण ताणतणावात राहू नये काही माहिती मिळाल्यास तात्काळ मला ,पो स्टे ला वा dail 112 वर कळवावे कोणत्याही संदेशावर डोळे बंद करून विश्वास न ठेवता त्याच्या सत्येतेची खात्री करा कोणत्याही अनोळखी व्यक्तीला परस्पर मारहाण करू नका कोणी संशयास्पद आढळून आल्यास पो स्टे ला कळवा

प्रताप शिकारे
पोलीस निरीक्षक
एमआयडीसी पो स्टे,जळगांव.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!