ताज्या घडामोडी

रेणुका कृषी प्रदर्शनाचे भुमिपुजन राज्याचे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या शुभहस्ते संपन्न.*

*रेणुका कृषी प्रदर्शनाचे भुमिपुजन राज्याचे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या शुभहस्ते संपन्न.*
पोलीस टाईम्स न्युज/ सुनिलआण्णा सोनवणे
*चांदवड* : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रेणुका कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून या ठिकाणी विविध 200 कंपनीचे स्टॉल लावले आहेत. त्यांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या शुभहस्ते सायंकाळी सहा वाजता करण्यात आले. यावेळी या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मोहन वाघ विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग ,जगदीश पाटील कृषी उपसंचालक ,संजय सूर्यवंशी उपविभागीय कृषी अधिकारी निफाड ,जयंत गायकवाड तालुका कृषी अधिकारी, या कार्यक्रमाचे निमंत्रक डॉक्टर आत्माराम कुंभार्डे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव ,तसेच कार्यक्रमाचे नियोजक अजय वाबळे आदीच्या उपस्थितीत रेणुका कृषी प्रदर्शनातील स्टॉलचे भूमिपूजन करण्यात आले .यावेळी या कार्यक्रमाचे निमंत्रक डॉक्टर आत्माराम कुंभार्डे यांनी कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य प्रवीण गेडाम यांची शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कार्यक्रमास आलेल्या इतर मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी कृषी प्रदर्शनात लावलेल्या स्टॉलचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी कृषी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या स्टॉलची पाहणी केली. व ग्रामीण भागात अशा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केल्याने समाधान व्यक्त केले.
तसेच या कार्यक्रमाचे उद् घाटन एक डिसेंबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे, तरी कार्यक्रमास तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान निमंत्रक डॉक्टर आत्माराम कुंभार्डे यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!