ताज्या घडामोडी

*विचारपुष्प

:*🌹

♦️ *विचारपुष्प*♦️

*🌹प्रत्येक माणसाने समाजात जगताना, वावरताना आपली काळजी घेऊन राहा व जगा, त्यासाठी हे मनापासून शांतपणे वाचा🌹*

*१ )■ जिथं ज्यांच्या जवळ पद, प्रतिष्ठा, धन , दौलत, साधन संपत्ती असते त्यांना खुप अहंकार, गर्व, घमेंड असते, अश्या ठिकाणी तेथे आपली नेहमीच जाणीवपूर्वक कदर केली जात नाही, तिथं आपण शकतो कधीही जायचं नाही. त्यांना तुम्ही केलेल्या उपकारांची जाणीव राहात नाही व ते जाणीव ठेवत नाहीत. ज्यांना आपण खर आहे तेच सांगितल्यावर राग येतो, त्यांची परत मनधरणी करत बसायचे नाही. जे आपल्या नजरेतून उतरलेत त्यांचा कधीही मनातून त्रास करून घ्यायचा नाही.*
_______________________________
*२ )■ आपल्या हातून एखाद्याचे काम होत असेल तर ते निःस्वार्थ बुद्धीने आणि निःसंकोचपणे करा. नेहमी दुसऱ्याला मदत करा, पण दुसऱ्याला मनापासून त्रास होईल असे कदापि वागू नका. आपण कितीही संपत्ती कमावली तरी शेवटी त्यांची किंमत शुन्य राहते*
_______________________________
*३ )■ नेहमी स्वतःसोबत पैज लावा, जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल, आणि हारलात तर अहंकार हारेल.*
_______________________________
*४ )■ पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात, आणि जर तोच तलाव कोरडा पडला तर किडे माश्याना खातात. संधी सगळ्यांना मिळते. फक्त आपली वेळ येण्याची वाट पाहा_____!*
_______________________________
*५ )■ एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर, त्याच्या ओठांवर थोडसं हसू आणि डोळ्यात थोडसं पाणी नक्कीच आलं पाहिजे____ !*
_______________________________
*६ )■ तुम्ही आपल्या दुःखात स्वतःच्या खांद्यावर डोके टेकून रडू शकत नाही आणि आपल्या आनंदात स्वतःच स्वतःला आनंदाने मिठी ही मारू शकत नाही…. आयुष्य म्हणजे दुसऱ्यांसाठी जगायची बाब आहे, पण स्वाभिमानने जगा___ !*
_______________________________
*७ )■ जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते, तसेच कुणावरही अतिविश्वास ठेवालाकी त्याची नीती, निष्ठां बिघडते व तो भ्रमिष्ठा होऊन सत्तापिपासू होऊन तो परत आपल्यावरच उलट फिरतो व विश्वास घातकी होऊ शकतो किंवा विश्वास घात करू शकतो______ !*
_______________________________
*८ )■ वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती वादळ जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो की, आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत चांगल्याबऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.__ !*
_______________________________
*९ )■ जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोन निर्माण केलं. चाफ्याची फुल सुद्धा त्यानीच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफयाचा सुगंध नसता का देता आला ? काही मजा आहेच की. नाहीतर त्यांनी अहंकार वाढला असता_!*
_______________________________
*१०)■ दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा. माणसातही नको असलेला अहंकार, घमेंड, मद, मस्तर, हेवा, द्वेष, दुष्टभावना आणि तिरस्कार भाग दूर करायला शिका.__!*
_______________________________
*११ )■ जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेंव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेंव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा.__ !*
_______________________________
*१२ )■ आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं, कारण अशा स्थळावरून परतताना माणूस माणूस राहत नाही. परतून येत ते मनातील खर चैतन्य__!*
_______________________________
*१३ )■ सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीच सोन करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती काढतात, तर काहीजण त्यातून मासे काढतात तर काहीजण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचे आहे.*
_______________________________
*१४ )■ तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते. कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यत, खोट गावभर खोटेच सांगून हिंडून परत आलेलं असत._!*
_______________________________
*१५ )■ प्रेमळ माणस तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो.*
_______________________________
*१६ )■ जगातील सत्य हेच कटु आहे की, जो सगळ्यांशी प्रेमाने, आपूलकीणे, मनःपासुन नाती जपतो तोच संगळ्यांशी नाती जपणारा नेहमी सर्वांपासून हळूहळू दुरावला जातो. कारण त्याचे मनात तुमच्या विषयी आदर, मान, सन्मान आहे म्हणून तो सर्वांची नाती जपत असतो________!*
_______________________________
*१७ )■ नेहमी लक्षात ठेवा की, ” आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा बडेजाव कधीही समाजात करू नका. लोकानां सर्व माहीत असते आपली संपत्ती कुठून कशी कधी व कश्याप्रकारे मिळवली आहे. तेव्हा झाकली मुठ तशीच राहुध्या, अन्यथा सर्व हिशोब जनता सांगेल, जसे समुद्रातील भरकटलेल्या जहाजात कितीही संपत्ती, पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यासाठी त्यास जमिनीशी जोडलेले राहावे लागते._________!*
_______________________________
*१८ )■ पदाचा, संपत्तीचा कधीही गर्व करू नये. कारण पद, प्रतिष्ठा अणि संपत्ती कधी निघुन जाईल ते कळणार ही नाही, त्यासाठी हितलरचे उदाहरण घ्या, जग जिंकायला निघाला आणि आत्महत्या करून शेवटी लवकरच जग सोडून गेला*

*”प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगू शकत नाही हे लक्षात ठेवा”…!!!*🙏

*🌹वाचण्यात आलेला सुंदर लेख 🌹*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!