ताज्या घडामोडी

लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करणार ; छगन भुजबळ यांच्या तारांकित प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे उत्तर*

*लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करणार ; छगन भुजबळ यांच्या तारांकित प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे उत्तर*

*लासलगाव बाह्य वळण रस्त्यावर पुल तयार आहे मात्र बाह्यवळणसाठी भूसंपादनाचे काम रखडले आहे ते तातडीने पूर्ण करा छगन भुजबळ यांची मागणी*

*मुंबई,नाशिक,दि.१६ मार्च :-* लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. याठिकाणी उड्डाणपुलाचे काम देखील पूर्ण झाले आहे. मात्र केवळ भूसंपादनास निधी नसल्याने हे काम रखडले आहे. त्यामुळे लासलगाव बाह्य वळण रस्ता आणि रेल्वे उड्डाणपूल भूसंपादनासाठी प्राधान्याने निधीची तरतूद करण्यात येऊन काम पूर्ण करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात केली. यावर उत्तर देतांना लासलगाव बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनासाठी निधी तरतूद करून रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

तारांकित प्रश्न उपस्थित करतांना छगन भुजबळ म्हणाले की, लासलगाव बाह्य वळण रस्ता आणि रेल्वे क्रॉसिंग ब्रिजसाठी आवश्यक जमिनीचे थेट खरेदी करून भूसंपादन करण्याकरिता येथील शेतकऱ्यांनी आवश्यक संमतीपत्र दिलेले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने थेट खरेदीसाठी दर सुद्धा निश्चित करून दिलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ खरेदीखते नोंदवून शेतकऱ्यांना मोबदला अदा करून थेट खरेदीची कार्यवाही करणे आवश्यक आहे. या भूसंपादनासाठी रक्कम रु.३१.५० कोटी निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनाकरिता रु. ३१.५० कोटी निधीची तरतूद करण्यात यावी व रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली. त्यावरील उत्तरात हे काम मार्गी लावण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!