ताज्या घडामोडी

तोंडापूर पिडीते साठी जिल्हा दंडाधिकारी कडे महिलांचे साकडे त्वरित कारवाई होणे आवश्यक – जिल्हा दंडाधिकारी ३ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

जळगाव; प्रतिनिधी शाहिद खान

जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील एका अल्पसंख्यांक आदिवासी महिलेसोबत झालेल्या अत्याचार प्रकरणी पहूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध अत्यंत साध्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणी गंभीर स्वरूपाचे कलमा अनव्ये गुन्हा दाखल होणे आवश्यक असून पुरवणी कलम लावा, सदर तपास महिला पोलिस अधिकाऱ्या मार्फत करावा,आरोपीस त्वरित अटक करावी.

अत्याचार पिडितेला शासना तर्फे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, एवढेच नव्हे तर सदर प्रकरणाचा सविस्तर तपास करून १५ दिवसाच्या आत न्यायालयात दोषारोपण पत्र सादर करावे व हे प्रकरण जलद न्यायालयात चालवुन आरोपीस कड़क शिक्षा करण्यात यावी अशी एक मुखी मागणी करण्यात आली.
सदर मागण्या ३ दिवसात मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे सुद्धा निवेदनात म्हटले आहे.

शिष्टमंडळात यांचा होता समावेश

मनियार बिरादरी चे अध्यक्ष फारूक शेख यांच्या नेतृत्वात आदिवासी तडवी महिला मंडळाचे अध्यक्ष रफीया बाबू तडवी, उपाध्यक्ष छाया कुंदन तडवी, राष्ट्रवादी प्रदेश सचिव प्रतिभा शिरसाठ,अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या नसरून सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, रिटायर डेप्युटी कमिशनर जीएसटी एन ए तडवी, रिटायर ट्रेझरी ऑफिसर बाबू इस्माईल तडवी ,काँग्रेस आयचेअल्पसंख्यक अध्यक्ष अमजद पठाण, ह्यूमन राइट चे अनवर खान, तड़वी आदिवासी महिला मंडळाच्या नजमा बी शेख, आलिशान बशारत, अरुणा खुदा बक्श तडवी,हमीदा बाबू, चारुलता सोनवने, मंजुबाई फिरोज तडवी, आबेदा सलीम तडवी, तसलीमा अजित तडवी, फिरदौस तडवी, शिवसेनेच्या गायत्री सोनावणे व चारुलता सोनावणे, यांची उपस्थिति होती

फोटो कॅप्शन
१)माननीय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देताना आदिवासी महिला मंडळाच्या सदस्य सोबत अनवर खान,अमजद पठाण, नासेर तड़वी, फारुक शेख , बाबू तडवी आदी दिसत आहे
२) जिल्हा अधिकारी यांच्याशी चर्चा करतांना शिष्टमंडल
३) जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणा देताना शिष्टमंडळ दिसत आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!