ताज्या घडामोडी
मुक्ताईनगरच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी प्रताप शिकारे यांची नियुक्ती
मुक्ताईनगरच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी प्रताप शिकारे यांची नियुक्ती
प्रतिनिधी शाहिद खान
मुक्ताईनगर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पदी प्रताप शिकारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून मुक्ताईनगर उपविभागीय अधिकारीपदी हे रिक्त होते. या पदावर नेमकी कोणाची वर्गणी लागणार याबाबत उत्सुकता लागुन होती. या अनुषंगाने या पदावर प्रताप शिकारे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
प्रताप शिकारे हे जळगाव येथे औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकात निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना अलीकडेच डी.वाय एस.पी.पदी बढती मिळाली असून पहिली नियुक्ती ही मुक्तीईनगर उपविभागत मिळालेली आहे. या माध्यमातून आता मुक्ताईनगर उपविभागला अधिकारी मिळाले आहेत.