जळगाव शहरात मेहरुण परिसरात सारा हॉस्पिटलजवळुन आयशर ट्रक लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मेहरुण परिसरातील रामनारात जावीद लतीफ पटेल हा तरुण वास्तव्यास असुन त्याच्याकडे (एम एच १९ सी वाय ४८४६) क्रमांक च्या आयशर ट्रक आहे हा ट्रक चालवून तो कुटुंबाच्या उदनिर्वाह करतो. दि. ८ रोजी रात्री ११ वाजता नाशिककडुन आल्यानंतर त्यांनी आपला ट्रक सारा हॉस्पिटलच्या मुख्य रस्त्यावर लावला होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या ट्रक अज्ञात चोरट्यांनी लांबवुन नेला. सकाळी जावेद यांचे वडील दूध घेण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या मुलाच्या ट्रक या ठिकाणी दिसून आला नाही त्यांच्या तात्काळ घटनास्थळी धाव घेतला ट्रकबाबत आजुबाजूच्यांकडे विचारपुस केली. मात्र त्यांना कुठलीही माहिती मिळून आली नाही त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीसत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अग्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करीत आहे
मुख्य संपादक काजी सलीम अलाउद्दीन 9850140788 येवला सह मुख्य संपादक डॉ. भारत देवलेकर सरकार मुंबई +919004737999
आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाशन
www.poicetimes.co.in
Related Articles
Check Also
Close