ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती साजरी.*

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती साजरी.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये राजश्री शाहू महाराज यांची जयंती *”सामाजिक न्याय दिन”* साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामनाथ काका एंडाईत हे होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला व सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.यावेळी मंथन परीक्षेत द्वितीय आलेली कु.तन्वी माळी हिचा सत्कार करण्यात आला.यानंतर अमोल आहेर व अजहर खतीब यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.प्रिंसिपल अल्ताफ खान यांनी आपले विचार व्यक्त करताना छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणीक धोरण, शैक्षणिक आरक्षणाचे जनक, राजश्रय , एकता, बंधुता विशद केली.
याप्रसंगी दीपक खैरनार,अजीम पटेल,सचिन घोडके,माधुरी माळी, निलिमा देशमुख,अर्चना एंडाईत,शोभा निकम,सुस्मिता देशमुख,आलिया खान सह सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता वडे यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!