ताज्या घडामोडी

*वसईत बेबी केयर फाउंडेशन तर्फे ४०० किशोरवयीन मुलींना व महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप*

*पालघर जिल्हा प्रतिनिधी: सुहास पांचाळ

वसईत बेबी केयर फाउंडेशन तर्फे ४०० किशोरवयीन मुलींना व महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप*

वसई/दि.०९ : बेबी केयर फाउंडेशन तर्फे वसईतील
कामन आश्रम शाळा, जिल्हा परिषद शाळा, चिंचोटी, नागले , उमलेे तसेच अंगनवाडी चिंचोटी स्तनदा माता अशा एकूण ४०० किशोरवयीन मुलींना आणि महिलांना मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शनासाठी खास स्पेन देशातून लोला मॅडम व अना मॅडम यांनी मासिक पाळीबद्दल योग्य मार्गदर्शन केले.

बालपण संपवून प्रौढ होतांना आपल्या शरीरात विविध बदल होत असतात. या बदलांपैकी महत्त्वपूर्ण आणि प्रारंभिक बदल म्हणजे मासिक पाळी येणे. पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर बहुतांश मुली घाबरतात. यामागचे कारण असे की, त्यांना या विषयाची पूर्णपणे कल्पना नसते. मासिक पाळी हे तारुण्यात प्रवेश करण्याचे लक्षण असून ही अतिशय सामान्य बाब आहे. त्यामुळे मुलींनी अशा परिस्थितीत घाबरून न जाता आपल्या घरातील व्यक्तींसोबत मोकळेपणाने बोलायला हवे. शरीरात होणाऱ्या या बदलामुळे बरेचसे प्रश्नही मनात येऊ शकतात.

मासिक पाळी म्हणजे काय? ती का येते? त्यामुळे काही त्रास होतो का? मासिक पाळी वेळी होत असलेला शारीरिक बदल कसा हाताळावा तसेच यौन अवस्था म्हणजे काय?
मासिक पाळी म्हणजे काय?
मुलींना मासिक पाळी कधी सुरु होते?
मुलींना पाळी का येते?
मासिक पाळीची वारंवारता आणि कालावधी,
मासिक पाळी मध्ये मी काय करावे?
सॅनिटरी पॅडचा वापर कसा करायचा व त्याची विल्हेवाट कशी लावायची.

या सर्व प्रश्नांची उत्तरे लोला मॅडम आणि अना मॅडम यांनी साध्या भाषेत समजावून योग्य मार्गदर्शन केले. एकूण ४०० मुली व महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.

यावेळी शालेय शिक्षक, बेबी केयर फाउंडेशनचे ॲलेक्स सर तसेच जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या स्वयंसेविका अर्चना पाटील हे उपस्थित होते.

मुलींना योग्य मार्गदर्शन करण्यात आले व मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप केले म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांनी *बेबी केयर फाउंडेशन* चे मनापासून आभार व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!