ताज्या घडामोडी

*एम.एस.जी.एस. शिक्षण संकुलात गणेश उत्सव निमित्त गुणवंतांचा सत्कार व जादूचे प्रयोग.*

*एम.एस.जी.एस. शिक्षण संकुलात गणेश उत्सव निमित्त गुणवंतांचा सत्कार व जादूचे प्रयोग.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल,सेमी इंग्लिश व ज्यु. कॉलेजमध्ये गुणवंतांचा सत्कार व जादूचे प्रयोग दाखविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार, समाजसेवक प्रभाकर झळके सर व सौ.विनिताताई अमोल सोनवणे या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती प्रतिमा पुजन व सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. शिक्षक अमोल आहेर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व गुणवंतांचा परिचय उपस्थितांना करून दिला.यानंतर गुणवणतांचा व पाहुण्यांचा सत्कार अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आला.यात प्रभाकर झळके सर, स्कुलची माजी विद्यार्थिनी अनुष्का सचिन मेहेकर (आर.जे.आयुर्वेदिक कॉलेज कोपरगाव बी.ए.एम.एस.साठी निवड ), स्कुलचा माजी विद्यार्थी पुष्कराज जीवन सोनवणे (मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पुणे येथे १२० विद्यार्थी पैकी ५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली त्यात याचा ही समावेश), डॉ.यशोदीप सुरेश बागल (अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज, सोलापूर M.B.B.S. उत्तीर्ण ), डॉ.अश्विनी गणपतराव देशमुख (रशिया मधून M.B.B.S.चे शिक्षण पूर्ण ), यांचा सत्कार अनुक्रमे संस्थेचे उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे, अध्यक्ष अरुण भांडगे, खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक राजेंद्र सोनवणे, जीवनशेठ गाडे, सौ.विनिताताई सोनवणे यांनी केला.संकुलासाठी गणेश उत्सव निमित्त चांद्रयान-३ ची प्रतिकृती बनवून दिल्याबद्दल मौनगिरी फाऊंडेशनचे अध्यक्ष म्हसू घोडेराव व सचिव मंगेश शिंदे यांचा ही सत्कार संचालक जनार्दन जानराव व प्रभाकर झळके यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर सकाळ वृत्तपत्र एन.आई.ए. स्पर्धेत सहभागी विद्यार्थी देवांश दीपक खैरनार UKG,आराध्या प्रकाश डुबे इ.१ ली,राजवीर अमोल सोनवणे इ.३री,स्वराली कृष्णा शिनगारे इ.४थी,देव भाऊसाहेब पुंड इ.४थी, स्वरा मयूर सोनवणे इ.५ वी,खदीजा अल्ताफ खान इ.५ वी,रोशनी देविदास गुडघे इ.६ वी, खुशी योगेश शिनगारे इ.६ वी, वेदश्री ज्ञानेश्वर वडनेरे इ.६वी, अनुजा संदीप लहरे इ.९ वी यांचा ही सत्कार उपस्थितांनी केला.
यानंतर डॉ.अश्विनी देशमुख, अनुष्का मेहेकर, डॉ.यशोदीप बागल यांनी यशाचे शिखर गाठतांना आलेल्या आपल्या विविध अनुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यानंतर येवला तालुक्यातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, जादूचे प्रयोग दाखवून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करणारे प्रभाकर झळके सर यांनी विद्यार्थ्यांसमोर विविध जादूचे प्रयोग दाखवून सर्वांना मंत्रमुग्ध केले. यात दोरी सरळ करणे, डब्यातून खाऊ काढणे, गुलदस्ता बनवणे, डब्यातून कबुतर, ससा काढणे इ.
अध्यक्षीय भाषणांत अरुण भांडगे यांनी गणेश उत्सव निमित्त शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रिन्सिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, पंडित मेहेकर सर, सचिन मेहेकर, नितीन देशमुख, शिक्षक अमोल आहेर, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, अजीम पटेल, अविनाश बोडारे, सचिन घोडके, पारस भगत, सुनील सपकाळ, शिवप्रसाद शिरसाठ, सचिन बोढरे, जितेश व्यवहारे, माधुरी माळी, नीलिमा देशमुख, निदा फारुखी, सुनीता वडे, सुषमा सोनवणे, कांचन गायकवाड, सुवर्णा कडलग, आदी सह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!