ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य कॅरम संघटनेवर जितेंद्र शाह – अरुण केदार व मंज़ूर ख़ान यांची बिनविरोध निवड*

*महाराष्ट्र राज्य कॅरम संघटनेवर जितेंद्र शाह – अरुण केदार व मंज़ूर ख़ान यांची बिनविरोध निवड*

सन २०२३ ते २०२७ या कार्यकालाकरिता २२ जुलै २०२३ रोजी दादर क्लब, दादर, पूर्व, मुंबई येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या निवडणुकीत पालघरच्या श्री जितेंद्र शाह यांची पुन्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून पुण्याचे श्री भारत देसडला यांनाही दुसऱ्यांदा कार्यध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. तर मानद सचिव या पदावर मुंबईच्या श्री अरुण केदार यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या श्री अजित सावंत यांचीही खजिनदारपदी दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी श्री नितिन करंडे यांनी निवडणुकीचे निकाल वाचून दाखविल्यानंतर निकालपत्र असोसिएशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र शाह यांच्याकडे सुपूर्द केले.
सन २०२३ – २०२७ कार्यकालाकरिता बिनविरोध निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे.
श्री जितेंद्र शाह ( अध्यक्ष ) पालघर
श्री भारत देसडला ( कार्याध्यक्ष ) पुणे
श्री धनंजय साठे ( उपाध्यक्ष ) सांगली
श्री गिरीश तुळपुळे ( उपाध्यक्ष ) रायगड
*मंजूर अहमद खान ( उपाध्यक्ष ) जळगाव*
श्री प्रदीप भाटकर ( उपाध्यक्ष ) रत्नगिरी
श्री यतिन ठाकूर ( उपाध्यक्ष ) मुंबई
श्री अरुण केदार ( मानद सचिव ) मुंबई
श्री अजित सावंत ( खजिनदार ) रत्नागिरी
श्री अभिजित मोहिते ( मानद सहसचिव ) कोल्हापूर
श्री श्री दत्तप्रसाद शेंबेकर ( मानद सहसचिव ) ठाणे
श्री इक्बाल नबी ( मानद सहसचिव ) मुंबई उपनगर
श्री केतन चिखले ( मानद सहसचिव ) मुंबई
श्री योगेश फणसळकर ( मानद सहसचिव ) सिंधुदुर्ग
श्री आनंद खरे ( कार्यकारिणी सदस्य ) नाशिक
श्री आशुतोश धोडमिसे ( कार्यकारिणी सदस्य ) पुणे
श्री जितेंद्र दळवी ( कार्यकारिणी सदस्य ) ठाणे
श्री संतोष चव्हाण ( कार्यकारिणी सदस्य ) मुंबई उपनगर

अरुण केदार
मानद सचिव
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!