तांबापुरात अब्दुल हमीद चौकात दुकानदाराच्या घरातून ; ५० हजाराची रोकड चोरी
तांबापुरात अब्दुल हमीद चौकात
दुकानदाराच्या घरातून ; ५० हजाराची रोकड चोरी
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील दुकानदाराच्या घरातून पन्नास हजाराची रोकड चोरी झाल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादिन शब्बीर पटेल, हे तांबापुरा परिसरातील शहीद अब्दुल हमीद चौकात वास्तव्याला आहे. त्यांचे बीजे मार्केट येथे चार चाकी व दुचाकी वाहनाच्या मीटर विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दोन मजली घरात १ व २ फेब्रुवारी दरम्यान रात्रीच्या कालावधीत हा चोरिच्या प्रकार घडला.
१ फेब्रुवारीच्या रात्री साधीन पटेल हे खालच्या मजल्यावरील घराला कुलूप लावून वरच्या मजल्यावर परिवारासह झोपण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता घराच्या कडीकोंडा तुटलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले. घरातील वस्तूंची पाहणी केली असता किचनमधील डब्यासह पर्समधील एकूण पन्नास हजाराची रक्कम चोरी झाल्याचे आढळून आले. या दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे