ताज्या घडामोडी

येथील ओम साईराम मित्र मंडळ आयोजित श्री साई चरित्र पारायण व कथामृत सोहळा सोहळा येथील बदापूर रोड येथील साईमंदिरात गुढीपाडव्यापासून सुरु करण्यात आला आहे. उद्या (ता. २९) सायंकाळी पाचला साई पालखीची मिरवणूक आयोजित केली आहे. गुरुवारी रामनवमीला दुपारी बाराला कथा समारोप,

येवला, सचिन वखारे, येवला
: येथील ओम साईराम मित्र मंडळ आयोजित श्री साई चरित्र पारायण व कथामृत सोहळा सोहळा येथील बदापूर रोड येथील साईमंदिरात गुढीपाडव्यापासून सुरु करण्यात आला आहे. उद्या (ता. २९) सायंकाळी पाचला साई पालखीची मिरवणूक आयोजित केली आहे. गुरुवारी रामनवमीला दुपारी बाराला कथा समारोप, काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी कथेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती ओम साईराम मित्र मंडळाने केली आहे.

साई कथाकार गजानन महाराज बंदरे (शिर्डी), कैलास महाराज राजगुरु (कोपरगाव), सौ. माधुरी राजेंद्र शिंदे (शिर्डी) यांच्यामार्गदर्शनाखाली श्री साई चरित्र पारायण रोज सकाळी पाचला सुरू करण्यात येते. सायंकाळी सात ते दहा या वेळेत श्रीसाई कथेचे आयोजन करण्यात येते. असा सात दिवसाचा भरगच्च कार्यक्रम श्री साई मंदिराच्या प्रांगणात सुरु आहे. साई पारायणाला व कथेला अनेक साईभक्त महिला व पुरुषांनी सहभाग घेतला आहे. साईभक्त वाल्मिक सोपे व आहेर सर यांच्या हस्ते सपत्नीक पुजा करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायणमामा शिंदे, किशोर कुमावत, जितेंद्र मिसाळ, अभियंता जनार्दन फुलारी, कैलास बाकळे,सुनिल देवरे आदि अनेक साईभक्त सहभागी झालेले आहेत. सौ. शोभा सुर्यवंशी, किशोर कुमावत, नारायणमामा शिंदे, श्रीकांत खंदारे, मुत्रा खंदारे, भैय्याबागडे, नगरसेवक सचिन शिंदे यांचे उपक्रम राबविण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

साई कथेमध्ये भूतदया, भक्तांचे रोग निवारण, भक्तांची इच्छापूर्ती, 1 बाबांचे चमत्कार व दिनचर्या या विषयी गजानन महाराज बंदरे यांनी = सांगितले. तर सुखाच्या शोधात मानसाचा जन्मही संपू शकतो, मात्र ज्या सुखाची अपेक्षा केली जाते, ते सुख सहजासहजी मानवाला मिळत नाही. असे साई कथाकार माधुरी शिंदे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे दिलीप पवार यांनी २ साई कथेचे निरुपन केले. या प्रसंगी राजाबापू शिंदे, कैलास चौधरी, सुनिल = देवरे, वाल्मिक सोपे, श्री. दुसाने, सतिश विसपुते, स्वप्नील शिंदे, श्री. वाघ, शेखर शिंदे, संजय कदम, परेश वडे, संदिप ठोंबरे, जितेंद्र

मिसाळ, भुषण वाबळे, मनोज माळी,शैलेष खंदारे,

अविनाश गवांदे, नाईकवाडे साहेब, शंभुराजे शिंदे,

सुभाष सूर्यवंशी, जगन शिंदे,
तुपसाखरे,
सचिन कुमावत,
शिंदे नाना यांनी पारायण व कथेचे आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत.
साठी सचिन वखारे येवला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!