ताज्या घडामोडी

आर्ट आॅफ लिविंग प्रणित, वैदिक धर्म संस्थान, बँगलोर यांच्या वतीने श्रावण मास रुद्र पूजा ओम नम: शिवाय या पवित्र मंत्रोच्चारात संपन्न झाला.

आर्ट आॅफ लिविंग प्रणित, वैदिक धर्म संस्थान, बँगलोर यांच्या वतीने श्रावण मास रुद्र पूजा ओम नम: शिवाय या पवित्र मंत्रोच्चारात संपन्न झाला. चेतनानगरातील श्रीकृष्ण मंदिरात परिसरातील सर्व रहिवाशांना आनंद, सुख शांती मिळावी तसेच रोगराई,नकारात्मक गोष्टींपासून मुक्ती मिळावी म्हणून माजी नगरसेविका संगिताअमोल जाधव यांनी स्वतः यजमान पद घेऊन रुद्र पूजा केली.रुद्र पूजा श्री श्री रविशंकर आश्रमातील स्वामी प्रणवानंद व वेदा पंडित यांच्या सानिध्यात पवित्र मंत्रोच्चारात आणि उत्साहात संपन्न झाली. पूजेच्या यशस्वीते साठी निताजी घुमरे,निलीमा गायधनी, संगीता चव्हाण, सुभाष कोल्हे, किरण गावंडे, प्रदीप गोसावी, श्री व सौ. मंगेश जाधव, योगिता गावंडे,भोजराज, निनाद व उमा यांनी अथक परिश्रम घेतले. या पूजेसाठी परिसरातून असंख्य नागरिक तसेच श्र स्मृती ठाकूर व आर्ट ऑफ लिविंगचे. शिक्षक, स्वयंसेवक,भाविक संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!