ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये डॉ.अब्दुल कलाम जयंती वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिवस साजरा.*

*एम.एस.जी.एस इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये डॉ.अब्दुल कलाम जयंती वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिवस साजरा.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारताचे अकरावे राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक अमोल आहेर होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ.कलाम यांची प्रतिमा पुजन व सहकार महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जागतिक हात धुवा दिवस निमित्त विद्यार्थ्यांना हात व्यवस्थित धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
याप्रसंगी प्रिन्सिपल अल्ताफ खान, दिपक खैरनार, गणेश सोनवणे, अविनाश बोडारे, अजीम पटेल, सचिन घोडके, पारस भगत, नवनाथ बत्तासे, निलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, सुस्मिता देशमुख,तहसीन अंसारी, मनीषा लहरे आदी सह सर्व शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!