ताज्या घडामोडी

गुरे चोरणारीः टोळी जेरबंद १९ गुन्हे उघड, व २ स्कॉर्पिओ जप्त

गुरे चोरणारीः टोळी जेरबंद १९ गुन्हे उघड, व २ स्कॉर्पिओ जप्त

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव जिल्हा विविध भागातून गुरांची चोरी करणाऱ्या टोळीच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परदाफाश केल्या असून टोळीतील तीन संशयित आरोपींना अजिंठा चौक परिसरातून दोन चारचाकींसह अटक केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील १९ गुन्हे उघडकीला आले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना शुक्रवारी १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषद दिली.
जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून गेल्या काही दिवसापासून गुरांची चोरी होत असल्याबाबत अनेक गुन्हे दाखल होते. या संदर्भात गुरे चोरणाऱ्या टोळीच्या पर्दाफाश करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक किसनराव नजनापाटील यांच्या मार्गदर्शनखाली पथकाने कारवाई केली. यात धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील. मोहंमद फयाज मोहंमद अयाज हा अजिंठा चौकात स्कॉर्पिओ कार क्रमांक (एमएच बीव्ही ९४१५) घेवून उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने गुरे चोरी केल्याची कबुली दिली.
यात वसीम मोहंमद अस्लम कुरेशी आणि नीम शेख कलीम दोन्ही रा. मासुमवाडी यांना देखील अटक केली आहे. तर जाफर गुलाब नबी रा. पाळधी ता. धरणगाव, हारुण उर्फ बाली शाह. रा. धुळे, अरशद रा. धुळे, आणि मनोज उर्फ मोन्या विठ्ठल पाटील, रा. कुसुंबा ता. जळगाव असे इतरांचे नाव निष्पन्न झाले असून त्यांच्याही शोध सुरू आहे. या कारवाईत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण ३ जणांना अटक केली असून दोन स्कॉर्पिओ जप्त केली आहे.
जामनेर,-१ भडगाव,-२ अमळनेर,-३
एरंडोल,-२ पारोळा,-२ चोपडा,-१
जळगाव तालुका – ३ मुक्ताईनगर,-४ पाचोरा,-१ असे एकूण १९ गुन्हे उघडकीला आले आहे. संकेत आरोपीकडून अजून गुन्हे उघड केला येण्याची शक्य आहे.
पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. किसनराव नजन पाटील यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. चोरट्यांना शोधार्थ किसनराव नजन पाटील यांना पोलीस उपनिरीक्षक गणेश चौभे, सहा. फौ. रवी नरवाडे, युनू शेख, पो.हे.कॉ संजय हिवरकर, पो.हे.कॉ राजेश मेढे, पो.हे.कॉ आशरफ शेख, पो.हे.कॉ संदीप सावळे, पो.हे.कॉ संदीप पाटील, पोहेको. सुनील दामोदर, पोहेको अक्रम शेख, पोहेको महेश महाजन, पोना संतोष मायकल, पोना नंदालाल पाटील, पोना भगवान पाटील, पोना हेमंत पाटील, पोको ईश्वर पाटील, पोको उमेश गोसावी, पोको हेमंत पाटील, पोको लोकेश माळी, भारत पाटील, दर्शन ढाकणे, अशोक पाटील, सर्व नेहमी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांचे तपास पथक तयार केले होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!