ताज्या घडामोडी

नॅशनल रेल्वे मजदुर युनियन कडून रेल्वे राज्यमंत्र्यांना कर्षण मशिन कारखाना नाशिक रोड च्या विस्तारीकरणाचे निवेदन सादर…*

*नॅशनल रेल्वे मजदुर युनियन कडून रेल्वे राज्यमंत्र्यांना कर्षण मशिन कारखाना नाशिक रोड च्या विस्तारीकरणाचे निवेदन सादर…*
*भारती धिंगान (प्रतिनिधी)* *नाशिक*
रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे हे दि 30-06-2023 शनिवारी नाशिक रोड स्टेशनला स्लीपिंग पॉड्स से उदघाटन करयाला आले होते.तेव्हा नॅशनल रेल्वे मजदुर युनियन टी.एम.डबल्यू शाखेने भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.सचिन दराडे यांच्या मार्गदर्शना खाली मध्य रेल्वेच्या नाशिक रोड येथील कर्षण मशिन कारखाना इथे 50 एकर जागा खाली आहे,वीज केंद्र जवळ असल्यामुळे वीज उपलब्धता आहे,कुशल कामगार आहे त्यामुळे या कारखान्याच्या विस्तार करून इलेक्ट्रिक इंजिन लोको शेड,रेल्वे इंजिन ट्रान्सफार्मर उत्पादन/रिपेअर,मेंमु ट्रेन कोच रीपेअर इत्यादी चा प्लांट लावून विस्तारीकरण करावे ज्यामुळे नाशिक का रोजगार निर्मिती होईल व उद्योगांना चालना मिळेल.या कारखान्यातील कामगारांची रिक्त पदे भरण्यात यावी, अन्य विभागातून बदलीवर आलेल्या कामगारांच्यावरचा अन्याय दूर करावा,या कारखान्याला लागणारा कच्चे सामान वेळेवर पुरवण्यात यावे या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत . निवेदनावर एन आर एम यू शाखा अध्यक्ष श्री.अनिल दराडे व सचिव श्री.व्ही के चौधरी यांच्या सह्या होत्या व निवेदन देताना,राजू वाघ,मधुकर सांगळे,गजानन शेळके,निलेश राऊत,अरुण बोर्डे,प्रसाद सुर्यवंशी,कुणाल भोसले व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!