ताज्या घडामोडी

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना आदरांजली

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना आदरांजली.*
सचिन वखारे, येवला.
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंती निमित्त आदरांजली देण्यात आली.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे रामनाथकाका एंडाईत तर अध्यक्षस्थानी अमोल आहेर होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला व सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.यानंतर शिक्षिका शर्मिला पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणांत अमोल आहेर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी स्कुलचे प्रिंसिपल अल्ताफ खान, दीपक खैरनार, सचिन घोडके, अजीम पटेल, अविनाश बोडारे, निलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, स्मिता खैरनार, पूनम घोंगाने, पल्लवी वडे, रोहिणी पुंड आदी सह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अजहर खतीब यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!